Kolhapur NCP Leaders : कोल्हापुरात दादांच्या राष्ट्रवादीत खदखद? पदाधिकारी भाजप- शिवसेनेच्या वाटेवर

NCP Leaders Joining BJP : कोल्हापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफाळले आहेत. काही प्रमुख पदाधिकारी भाजप आणि शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत
Ajit Pawar NCP
Ajit Pawar NCPSarkarnama
Published on
Updated on

विधानसभा निवडणुकीत महायुती मधील राष्ट्रवादीला कोल्हापूर जिल्ह्यात एका जागेवर यश मिळाले. एकंदरीतच महायुतीला यश मिळाल्याचा आनंद राष्ट्रवादीला देखील आहे. जिल्ह्यात एकमेव आमदार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ असले तरी जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या विस्तारावर मर्यादा येत आहेत. शिवाय चंदगडचे राजेश पाटील यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने पक्ष वाढीला देखील फटका बसला आहे.

राष्ट्रवादीची जिल्ह्यात ही अवस्था असताना पुन्हा एकदा राष्ट्रवादीतील खदखद आता खाजगीत बाहेर येत आहे. स्थानिक नेतृत्वाच्या एकमुखी कारभारा विरोधात दुसऱ्या फळीतील पदाधिकारी वैतागले आहेत. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजप किंवा शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलवले जात आहे.

Ajit Pawar NCP
Udayanraje : आक्रमक उदयनराजेंचा खणखणीत इशारा; ‘....अन्यथा आम्हाला वेगळा पवित्रा घ्यावा लागेल’

राष्ट्रवादीत (NCP) दोन गट पडल्यानंतर एक राष्ट्रवादी महायुती सोबत गेली. त्याचा परिणाम कोल्हापूर जिल्ह्यात देखील झाला. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि चंदगडचे तत्कालीन आमदार राजेश पाटील हे देखील महायुतीत गेले. त्यांच्यासोबत कोल्हापूर जिल्हा बँक आणि गोकुळ दूध संघातील संचालक विधानसभा निवडणुकीत महायुती सोबत राहिले. तर कोल्हापूर शहरातील प्रमुख पदाधिकारी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत राहिले. केवळ राष्ट्रवादीचे नेते आणि माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सोबत राहण्याचा निर्णय घेतला.

मात्र गेल्या काही दिवसातील कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादीत खदखद आहे. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर हे खदखद बाहेर येण्याची शक्यता आहे. शहरातील आणि जिल्ह्यातील स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्यांवर दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील नाराज आहे.

Ajit Pawar NCP
Rohit Pawar Attack On Munde : धनंजय मुंडे यांच्यात ते धाडस नाही; रोहित पवारांचा जोरदार हल्लाबोल

शहरातील एकहाती कारभार करणाऱ्या पदाधिकाऱ्याच्या विरोधात नाराजी असल्याचं वरिष्ठांना कळविले आहे. मात्र वरिष्ठांच्या जवळचे असलेल्या या पदाधिकारी विरोधात कारवाईची तसदी घेत नसल्याने अखेर या नाराज पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा किंवा भाजपचा रस्ता धरण्याचा विचार केला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर शहरात आणि जिल्ह्यातील काही ठिकाणी राष्ट्रवादीची पदाधिकारी महायुती मधील इतर पक्षात जाण्याची तयारी करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com