Sharad Pawar: कोल्हापुरात 8 ठिकाणी तुतारीचा आवाज बंद, केवळ 12 जागा चिन्हावर लढण्याची नामुष्की

Kolhapur NCP Sharad Pawar Tutari news: शिरोळ, कुरूंदवाड या नगरपालिका, तर हातकणंगले, आजरा, चंदगड या नगरपंचायतींमध्ये पक्षाचे उमेदवार तुतारी वाजविणार आहेत. उर्वरित आठ ठिकाणी उमेदवारच नसल्याने पक्षाचे चिन्ह गायब झाले आहे.
NCP Sharadchandra Pawar Party
NCP Sharadchandra Pawar PartySarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: राज्यात महायुतीमध्ये राष्ट्रवादीमध्ये दोन गट निर्माण झाले असले तरी गाव गाड्यांमध्ये अजूनही राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना मानणारा गट आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत याच जुन्या-जाणत्या मतदारांकडून कौल मिळण्याचा अंदाज असताना जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत सपशेल फोल ठरले आहेत.

ज्या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली त्याच उमेदवारांनी या निवडणुकीत पक्षाचे चिन्ह खाली ठेवले आहेत. शत्रूला शरण जाण्याची परिस्थिती या नगरपालिका निवडणुकीत आल्याने कोल्हापूर जिल्ह्यात केवळ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हावर केवळ बारा जागा लढण्याची नामुष्की आली आहे. तर तेरापैकी आठ ठिकाणी तुतारी चिन्हाचा नामोनिशान नाही.

विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात तीन उमेदवार तुतारी चिन्हावर दिले होते. कागल चंदगड आणि इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने लढत असताना पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची आशा धरून बसलेल्या कार्यकर्त्यांचा गेम विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांनीच केल्याचे दिसते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली. मात्र, लोकसभा आणि विधानसभावेळी झालेल्या आघाडीतील मित्रपक्षांनी सोयीची भूमिका घेतल्याने शिरोळ, कुरूंदवाड या नगरपालिका, तर हातकणंगले, आजरा, चंदगड या नगरपंचायतींमध्ये पक्षाचे उमेदवार तुतारी वाजविणार आहेत. उर्वरित आठ ठिकाणी उमेदवारच नसल्याने पक्षाचे चिन्ह गायब झाले आहे.

NCP Sharadchandra Pawar Party
Ravi Rana BJP Support : ‘स्वबळाची' तलवार म्यान ; 'स्वाभिमान' बाजूला ठेवत रवी राणा पुन्हा ‘भाजप के साथ’

लोकसभेत मिळालेला कौल आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात सत्ता बदलाच्या केलेल्या निर्धाराला मिळत असलेल्या प्रतिसादाने विधानसभेवेळी कोल्हापुरातील कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला. कागल, चंदगड, इचलकरंजी या जागा पक्षाला मिळाल्या. या तिन्ही मतदारसंघांतील बलाढ्य विरोधकांना टक्कर देऊन समरजितसिंह घाटगे, नंदिनी बाभूळकर, मदन कारंडे यांच्या विजयाचे खाते उघडण्यासाठी कार्यकर्त्यांनी ताकदीने 'तुतारी' फुंकली. मात्र, ती वाजलीच नाही.

कागल, मुरगूडमध्ये मंडलिकांना पाठबळ पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या समरजितसिंह घाटगे यांनी ऐनवेळी कागल, मुरगूडसाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत जाण्याची धक्कादायक भूमिका घेतली. त्याचे तीव्र पडसाद पक्षात उमटले. जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी घाटगे यांच्या भूमिकेचा तीव्र शब्दांत निषेध करून शिवसेनेचे (शिंदे गट) माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांना पाठबळ देत असल्याचे जाहीर केले.

'भाजप'सोडून इतर कोणत्याही पक्षासमवेत आघाडी करा. स्थानिक पातळीवर निर्णय घ्या, असे सांगत मोकळीक दिली. त्यावर पहिल्यांदा नंदिनी बाभूळकर यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार राजेश पाटील यांच्याशी चंदगडमध्ये युती केली. त्यानंतर काही दिवसांत समरजितसिंह घाटगे यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी कागल, मुरगूडमध्ये युती केली.

आघाडीत एकवटलेल्या काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट या पक्षांच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी सोयीच्या राजकारणाची भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीची (शरद पवार गट) काहीशी अडचण झाली. त्यातून कागल, मुरगूड, पेठवडगाव, जयसिंगपूर, हुपरी, पन्हाळा, मलकापूर, गडहिंग्लज या नगरपालिकांमध्ये पक्षाची 'तुतारी' गायब झाली आहे.

जयसिंगपूरमध्ये तर भाजपबरोबर जाण्याची पक्षावर वेळ आली. शिरोळ, कुरुंदवाड, हातकणंगले, आजरा, चंदगड येथे मात्र, 'तुतारी' कायम राहिली आहे. तर तुतारी' चिन्हावर बारा उमेदवार लढणार आहेत. त्यात चंदगडमध्ये सर्वाधिक सहा आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा समावेश आहे. हातकणंगलेमध्ये दोन, तर शिरोळ, कुरूंदवाड, आजरा नगरपालिकेमध्ये प्रत्येकी एक उमेदवार असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com