Chandrakant Patil: चंद्रकांतदादांनी फडणवीसांना अक्षरशः पळवलं! इचलकरंजीमध्ये काय घडलं?

Devendra Fadnavis Tour Chandrakant Patil influence:निवेदक बोलत असताना मंत्री पाटील यांनी त्यांना थांबण्याचे विनंती केली. निवेदकाला प्रस्तावित भाषण न करू देता थेट माइक हातात घेत स्वतःच पाटील यांनी प्रास्ताविक भाषण आटोपते घेतले.
CM Devendra Fadnavis Tour
CM Devendra Fadnavis TourSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज इचलकरंजी येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला. मात्र या सोहळ्यापूर्वी इचलकरंजी मध्ये राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील चांगलेच गडबडीत दिसले. कार्यक्रम प्रसंगी मंत्री चंद्रकांत पाटील यांची गडबड आणि धावपळ पाहून सर्वजण चांगलेच उत्साही बनले. शिवाय इतकेच नव्हे तर कार्यक्रम आटोपता घेण्यासाठी मंत्री पाटील यांनी निवेदकालाच दम देत शांत बसवले. त्याची चर्चा इचलकरंजीत चांगलीच रंगली.

आज सकाळपासूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापुरात येणार असल्याने इचलकरंजीमध्ये कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आमदार राहुल आवाडे यांनी कार्यक्रम स्थळाची पाहणी करत नियोजकांसह निवेदकांना सूचना केल्या. सकाळी 10:30 वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचे उद्घाटन होणार होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कार्यक्रम स्थळी येण्यासाठी सव्वा अकरा वाजले. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर जायचे होते. ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाची उद्घाटन होणार होते. आणि त्यानंतर पुण्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे पूजन होणार होते.

दिवसभर मुख्यमंत्र्यांचा धावता दौरा असल्याने कार्यक्रम उरकून घेण्याचे धांदल सुरू होते. अशातच आज सकाळी राज्य निवडणूक आयोगाकडून सायंकाळी चार वाजण्याच्या पत्रकार परिषदेचे निमंत्रण सर्वच माध्यमांना देण्यात आले. याची कुणकुण उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना लागली. इचलकरंजी येथील कार्यक्रम स्थळी मुख्यमंत्री आणि सर्व मान्यवरांचा ताफा पोचल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनीच व्यासपीठाचा ताबा घेतला.

निवेदक बोलत असताना मंत्री पाटील यांनी त्यांना थांबण्याचे विनंती केली. निवेदकाला प्रस्तावित भाषण न करू देता थेट माइक हातात घेत स्वतःच पाटील यांनी प्रास्ताविक भाषण आटोपते घेतले. आमदार राहुल आवाडे यांना भाषण आवरण्याची सूचना केली. चार ते पाच मिनिटात भाषण आवडे यांनी केल्यानंतर पुन्हा एकदा मंत्री पाटील यांनी माईकचा ताबा घेतला. यावेळी पुढील भाषणासाठी खासदार धैर्यशील माने यांना निवेदन विनंती करत असताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा निवेदकाला दम दिला. आणि खासदार धैर्यशील माने यांना मोजक्यात शब्दात करा अशाच कडक सूचना दिल्या.

CM Devendra Fadnavis Tour
Devendra Fadnavis News: विरोधक अन् मित्र पक्षांनाही का झालीयं देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत पाठवण्याची घाई?

खासदार धैर्यशील माने यांचे भाषण लांबलेले दिसताच चंद्रकांत पाटील यांनी थेट खुर्चीतून उठून धैरशील माने यांच्या पाठीमागे उभारले. भाषण आवरते घेण्याचा सल्ला दिला. त्याचा खासदार माने यांनी भाषणात उल्लेख करताच सर्वत्र हशा पिकला. मात्र यानिमित्ताने चंद्रकांत पाटील यांची गडबड चांगलेच दिसली.

सायंकाळ नंतर कोणत्याही क्षणी आचारसंहिता लावण्याची शक्यता असल्याने चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा आटोपता घेतला. चंद्रकांत पाटील हे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. सांगली जिल्ह्यातील कार्यक्रम आटपून पुन्हा मुख्यमंत्र्यांना पुण्यात कार्यक्रम स्थळी जाणे भाग होते. राज्य निवडणूक आयोगाच्या अगोदर पुण्यातील कार्यक्रम घेणे गरजेचे होते. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर आज प्रभाव पाहायला मिळाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com