Kolhapur News, 27 July : पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या पूरस्थिती पाहणी दौऱ्यात दोन चालकांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य आणि आमदार पुत्र राहुल आवाडे व खासदार धैर्यशील माने यांच्या चालकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे.
ही घटना इचलकरंजी येथे घडली असून गाडी पार्किंग करताना एकमेकांना गाडी घासल्याने दोन चालकांमध्ये धूमचक्री झाली. यावेळी संतप्त चालकांनी एकमेकांना शिवीगाळ करत पट्ट्याने माराहान केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे, पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यासमोरचं दोघांची कपडे फाटेपर्यंत एकमेकांना माराहाण सुरूच होती. अखेर पालकमंत्री मुश्रीफ यांच्या चालकाने अन्य नागरिकांनी या दोघांत मध्यस्थी करत वाद मिटवला.
कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ सध्या जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज (ता. 27 जुलै) रोजी ते इचलकरंजी आणि शिरोळ भागातील पूर परिस्थिती पाहण्यासाठी गेले होते. यावेळी खासदार धैर्यशील माने (Dhairyashil Mane) सुद्धा उपस्थित होते. तसेच आमदार प्रकाश आवाडे यांची पुत्र आणि जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल आवाडे हे देखील उपस्थित होते.
इचलकरंजी येथे दौऱ्यात असताना आवडे आणि खासदार माने यांची गाडी पार्किंग करत असताना एकमेकांना घासल्याने मोठा वाद निर्माण झाला. माने यांचा चालक योगेश पाटील व आवाडे यांचा चालक मनोज लाखे यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला. यावेळी संतप्त झालेल्या चालकांनी एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहत अंगावर धावून गेले. आणि चक्क एकमेकाला बेल्टने मारहाण करायला सुरुवात केली.
हा वाद इतका वाढला की, दोघेही एकमेकांच्या अंगावर घेऊन जात कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. दरम्यान पालकमंत्री यांचा चालकाने या दोघांमध्ये मध्यस्थी केली. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ देखील घटनास्थळापासून थोड्याच अंतरावर होते.
या घटनेनंतर पूरग्रस्तांची पाहणी करण्यासाठी आलेल्या या लोकांना महापुराचे गांभीर्य नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान हा व्हिडिओ शहरात व्हायरल झाल्यानंतर त्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे. तर अशा या चालकांवर नेते काय कारवाई करणार याकडे लक्ष लागलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.