Kolhapur Politics : शिक्षक बँक निवडणूक; काँग्रेसचे आमदार आसगावकर अन् दादा लाड भिडणार, लक्षवेधी लढत!

Teacher Bank Election News : 'कोजिमाशी'च्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील राडा नित्याचाच, यावेळी बँकेची निवडणूक कशी असणार?
Kolhapur News
Kolhapur News Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात चर्चेत असणारी शिक्षकांची बँक म्हणून कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व कर्मचारी सहकारी पतपेढीकडे (कोजिमाशि) पाहिले जाते. वार्षिक सर्वसाधारण सभेत नित्यनेमाने होणार राडा लक्षात घेतला तर यावेळी या बँकेची निवडणुकीत कशी होणार? याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले असते. या बँकेची निवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे कारण काँग्रेसचे आमदार जयंत आसगावकर हे शिक्षक नेते दादा लाड यांना भिडणार आहेत. (Latest Marathi News)

Kolhapur News
NCP Crisis : गुगल ट्रेंडमध्येही शरद पवार-अजितदादांमध्ये अटीतटीचा ‘सामना’; राजीनामा सर्वाधिक सर्च

यंदा 'कोजिमाशि'ची निवडणू दुरंगी होत आहे. आमदार जयंत आसगावकर व शिक्षक नेते दादा लाड यांनी त्यांचे स्वतंत्र पॅनेल जाहीर केले आहेत. त्यामुळे पतसंस्थेच्या निवडणुकीनंतर आता आमदार जयंत आसगावकर आणि दादा लाड यांच्यात 'कोजिमाशि'च्या निवडणुकीत पुन्हा एकदा थेट सामना होणार आहे.

आज अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी 17 जागांसाठी 38 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. 7 जानेवारीला मतदान होणार आहे. आमदार जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू सत्तारूढ आघाडीचे उमेदवार पुढीलप्रमाणे उमेदवार दिले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Kolhapur News
Pune DPDC News : 800 कोटींची कामे कशी मंजूर केली? भाजप-शिंदे गटाचा अजित पवारांविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा...

आमदार जयंत आसगावकर यांचे पॅनेल -

सर्वसाधारण गट :

शिवाजी बापूसो लोंढे (गणेशवाडी),

महादेव पांडुरंग चौगले (कोल्हापूर),

दिलीप बाबूराव पाटील (कोल्हापूर),

सुनील कृष्णात पाटील (सांगरूळ),

के.एच.पाटील (मल्हारपेठ),

हिंदुराव तुकाराम डोंब (काळजवडे),

सरदार विठ्ठल पाटील (नेर्ली)

गजानन दिनकर काटकर (कोल्हापूर),

कृष्णात रामचंद्र पाटील (मौजे सांगाव),

धनाजी गुंडू पाटील(बावेली),

जयसिंग मारुती पवार (पडसाळी),

राजेंद्र सदाशिव कारंडे (शिरगाव),

भटक्या जाती :

व्ही. एम. लटके (सांगशी),

महिला राखीवः

सुप्रिया बापूसो शिंदे (कोल्हापूर),

रेखा अजित रावराणे (कसबा बावडा)

अनुसुचित जातीः

शानाजी विष्णू माने (व्हन्नूर),

इतर मागासः

उमेश शामराव माळी (गंगानगर).

दादा लाड यांचे स्वाभिमानी सहकार आघाडीचे उमेदवार :

सर्वसाधारण गटः

अमर वसंत इंगळे (कणेरी),

मच्छिंद्रनाथ सखाराम शिरगावकर (काळजवडे),

जोतिराम बंडू पाटील (बेलवळे खुर्द ),

सुभाष गणपती पाटील (माळापुडे),

प्रदीप रामचंद्र पाटील ( परखंदळे),

जगन्नाथ शरद पोतदार (हणमंतवाडी),

राजेंद्र मारुतराव साळोखे (घानवडे),

शिवाजी दगडू गायकवाड (गिरगाव),

मारुती नारायण पाटील (नरतवडे),

मनोहर संभाजी पाटील (मनमाड),

वैभव दत्तात्रय गुरव (वाघवे),

किसन रामचंद्र पाटील( दुर्गमनवाड),

इतर मागास प्रतिनिधीः

कैलास निवृत्ती सुतार (कोल्हापूर),

भटक्या जाती जमातीः

संदीप अण्णासो इंगळे (कसबा वाळवा),

अनुसूचित जातीः

दीपक गुंडू कांबळे (तिसंगी),

महिला राखीवः

सुनंदा पांडुरंग पवार (सिद्धनेर्ली),

नेहा नितीन भुसारी (कणेरीवाडी).

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मिलिंद ओतारी काम पहात आहेत.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com