Devendra Fadnavis: लोकसभेत वोट जिहाद, देवेंद्र फडणवीस यांचा रोष कोणावर ?

DCM Devendra Fadnavis on Vote Jihad:आम्ही संघटीत होऊन मतदान करू आणि हिंदुत्ववाद्यांना पराभूत करू शकतो. म्हातारी मेल्याचं दुःख नाही. पण काळ सोकोवतो आहे. संत शक्तीने हिंदू विरोधकांच्या मुकाबला करण्यासाठी पाठबळ द्यावे....
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: कोल्हापुरातील कणेरी मठ येथील कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात बोलत असताना फडणवीस यांनी एका विशिष्ट धर्माबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

देशात पुन्हा एकदा सांस्कृतिक पुनरुत्थान होत आहे. हे अनेकांना पहावत नाही. त्यामुळे हिंदू विरोधकांनी हिंदू विरोधी जागतिक वातावरण तयार करण्याचे षडयंत्र रचले आहे. लव्ह जिहाद पाठोपाठ वोट जिहाद (Vote Jihad) प्रत्यंतर लोकसभा निवडणुकीत आले, त्यामुळे संत शक्तीने हिंदू विरोधकांच्या मुकाबला करण्यासाठी पाठबळ द्यावे, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

लव्ह जिहाद प्रमाणेच लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला वोट जिहाद देखील पाहायला मिळाला. धुळे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच विधानसभा मतदारसंघात एक लाख 90 हजार मतांनी पुढे असलेला उमेदवार, मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात एक लाख 94 हजार मतांनी मागे जातो. दुसरा उमेदवार 4000 मतांनी निवडणूक हरतो. हे उदाहरण म्हणावे लागेल.

निवडणुकीतील हार जीत महत्त्वाची नाही. पण काही लोकांचा आत्मविश्वास इतका वाढला आहे. की त्यांना असं वाटतंय आमची संख्या कमी असली तरी आम्ही संघटित होऊन मतदान करू आणि हिंदुत्ववाद्यांना पराभूत करू शकतो. म्हातारी मेल्याचं दुःख नाही. पण काळ सोकावला तशाप्रकारे आपल्याला पाहायला मिळत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.

Devendra Fadnavis
Maharashtra Swarajya Party: संभाजीराजेंच्या 'स्वराज्य' संघटनेला 'महाराष्ट्र स्वराज्य पक्ष' म्हणून मान्यता

या निवडणुकीतील वोट जिहाद आहे. लोकसभेला 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात अशा पद्धतीने वोट जिहाद पाहायला मिळाले. हिंदू धर्माने कधीही दुसऱ्या धर्माचा अनादर केला नाही आम्ही तो करणार देखील नाही. पण हिंदू विचार संपवण्याकरिता किंवा हिंदूविरोधी लोकांना पदावर बसवण्यासाठी मतदान होणार असेल, तर हिंदू समाजाला मार्गदर्शन करणारे संत आहेत. त्यांना माझा आवाहन आहे. त्यांना देखील हिंदुत्व जागृत करावंच लागेल करावंच लागेल. हिंदू विरोधकांच्या मुकाबलासाठी संत शक्तीने पाठबळ द्यावे, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com