Yogesh Tilekar: विधानसभेत महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवा; योगेश टिळेकरांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Yogesh Tilekar Attack on Mahavikas Aghadi over Assembly Elections 2024:विधानसभा निवडणुकीत जनतेच्या आशीर्वादावर महायुतीचे सरकार सत्तेवर येईल त्यामुळे समाज उपयोगी कामात भाजपच्या कार्यकर्त्यांनी झोकुन द्या, असे योगेश टिळेकर आवाहन केले.
Yogesh Tilekar
Yogesh TilekarSarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूरात आज भाजपचे जिल्हा अधिवेशन पार पडले. अधिवेशनात विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुनावले. जनतेची दिशाभूल करून लोकसभा निवडणुकीत यशाच्या वल्गना करणाऱ्या महाविकास आघाडीला आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवा, असे विधान योगेश टिळेकर यांनी केले.

"महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जनसामान्यांच्यासाठी अनेक योजना आणली आहे. लाडकी बहीण योजना, वयोश्री योजना शेतकऱ्यांना मोफत वीज अशा अनेक योजना देणारे हे सरकार शेतकरी, महिला, युवक व गोरगरिबांच्या भल्याचाच विचार करते.

त्यामुळे विरोधकांनी कितीही वल्गना केल्या तरी उद्याच्या विधानसभा निवडणुकीत जनतेच्या आशीर्वादावर महायुतीचे सरकार सत्तेवर येईल त्यामुळे समाज उपयोगी कामात भाजपच्या कार्यकर्त्यांनी झोकुन द्या, असे योगेश टिळेकर आवाहन केले.

Yogesh Tilekar
Pankaj Sable: मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांचा मिटकरींवर पलटवार; जय मालोकार याचे नाव FIR कुणी टाकलं?

देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनचा ठराव जिल्हा सरचिटणीस नाथाजी पाटील यांनी मांडला. महाराष्ट्र सरकारने अनेक चांगल्या लोकोपयोगी योजना महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आणल्याबद्दल महाराष्ट्र सरकारच्या अभिनंदनचा ठराव जिल्हा सरचिटणीस गायत्री राऊत यांनी मांडला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com