
Kolhapur News, 07 Dec : लोकसभा निवडणुकीत अपयशाला सामोरे गेल्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) घवघवीत यश मिळालं. सरकार स्थापनेवेळी महाराष्ट्राच्या विकासासाठी आता थांबणार नाही अशी टॅगलाईन घेऊन मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली.
राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर आता कागलमधील आमदार हसन मुश्रीफ देखील आता थांबणार नाहीत. गेल्या दोन वर्षांपासून हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी आपण सहाव्यांदा आमदार होण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं सांगितलं होतं. या विधानसभाच्या निकालानंतर त्यांची डबल हॅट्रिक झाली.
त्यानंतर आता मुश्रीफ यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका व्यक्त करत आपण पुन्हा आमदार होऊन खासदार होणार आणि केंद्रात मंत्री होणार अशी भूमिकाच जाहीर करून टाकली आहे. कागल विधानसभा मतदारसंघातील (Kagal Assembly Constituency) निवडणूक यंदा राज्यात चर्चेची विषय ठरली होती. आमदार हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांच्यात इथे लढत झाली.
घाटगे यांनी मुश्रीफ यांच्यासमोर आव्हान उभं केलं होतं मात्र निकालात मुश्रीफ यांनी बाजी मारली. कागलच्या जनतेने पुन्हा विजयी केल्यानंतर मुश्रीफांनी मतदारसंघातील मतदारांचे आभार मानले. कागल मतदारसंघातील जनतेने मला सहाव्यांदा निवडून दिले. त्यांचे आभार मानावेत तितके थोडेच आहेत.
जनतेच्या आशीर्वादामुळेच हे शक्य झालं आहे. त्यामुळे पुन्हा सातव्यांदा विधानसभेची निवडणूक लढवण्याची माझी इच्छा आहे. ती शेवटची विधानसभा निवडणूक असेल, असं मुश्रीफ म्हणाले. दरम्यान, सातव्यांदा आमदार झाल्यानंतर मी लोकसभेच्या मैदानात असणार आहे. खासदार होऊन केंद्रात मंत्री होण्याची माझे स्वप्न आहे.
गोरगरीब सर्वसामान्यांची सेवा बजावली तर मतदारसंघातील लोक कसे पाठीशी राहतात हे या निवडणुकीतून दिसून आले आहे. पुढील पाच वर्षात महिलांचे आरक्षण वाढणार आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षात काय होईल हे सांगता येणार नाही. यामध्ये आपल्या मतदारसंघाचे काय होणार आहे याचे काळच उत्तर देईल, असंही मुश्रीफ म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.