Kolhapur Politics : विधानसभेच्या आधीच काँग्रेस कार्यकर्त्यांना ए. वाय. पाटलांचं वावडं

Kolhapur News Radhanagari Assembly Constituency : राधानगरी विधानसभा मतदारसंघातून सर्वच महायुतीचे नेते विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याने ऐन निवडणुकीत गोची होऊ नये, हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून ए.वाय पाटील यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याची चर्चा आहे.
A Y Patil
A Y Patilsarkaranama
Published on
Updated on

Kolhapur News, 23 July : आगामी विधानसभा निवडणुकीचे बेरजेचे राजकारण लक्षात घेऊन महायुतीतून बाजूला होत महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांना राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ए.वाय पाटील यांनी पाठिंबा दिला.

राधानगरी विधानसभा मतदारसंघातून सर्वच महायुतीचे नेते विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याने ऐन निवडणुकीत गोची होऊ नये, हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून ए.वाय पाटील यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. (Radhanagari Assembly Constituency)

मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर उपऱ्या उमेदवाराला संधी नको, अशी भावनाच काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांची निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी यासंदर्भात बैठक झाली. पण आता नुकतीच कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन उमेदवार देखील ठरवला. त्यामुळे पक्षात घेण्याआधीच ए.वाय पाटील यांचं काँग्रेस कार्यकर्त्यांना वावडं वाटू लागलं आहे.

A Y Patil
Ajit Pawar News : ...अन् अजितदादांचा पारा चढला; सरकारमधील मंत्र्यांना म्हणाले, 'राज्यातल्या जमिनी विकून पैसे देऊ का ?'

राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये आजी-माजी आमदारांच्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु असतानाच काँग्रेसमधून उमेदवार देण्याच्या हालचालीला वेग आला आहे. राधानगरी तालुक्यातून गोकुळचे संचालक आर.के मोरे यांच्या उमेदवारीवर कार्यकर्त्यांनी शिक्कामोर्तब केलं आहे . हात या चिन्हावरच निवडणूक लढवायची हा निर्धार झाल्याने तिरंगी लढतीच्या दिशेने विधानसभेच्या वाटचाल सुरू झाली आहे.

हा विधानसभा मतदारसंघ सातत्याने भुदरगडच्या वाट्यालाच अधिक गेला. यामुळेच आजी-माजी आमदारांचे वर्चस्व कायमपणे भुदरगड वरूनच राहिलं आहे. विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांना रोखण्यासाठी माजी आमदार के. पी. पाटील यांनी तर चंगच बांधला आहे. अशातच बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाच्या वादामुळे आणखीनच ठिणगी पडली.

डिस्टिलरी व इथेनॉल प्रकल्पाला खोडा घालण्यासाठी आमदार आबिटकर हेच कारणीभूत असल्याने कारखाना अडचणीत आणण्याचे षडयंत्र हे भांडवल माजी आमदार पाटील यांनी करून जागृती सुरू केली आहे. ते खोडून काढण्यात आबिटकर यांचे मेळावे सुरू आहेत. हा सगळा कारभार बिद्री कारखाना कार्यक्षेत्रात सुरू असतानाच दुसरीकडे राधानगरी तालुक्यामध्ये आपला हक्काचा उमेदवार असावा यासाठी काँग्रेसमधून चाचपणी सुरू आहे.

A Y Patil
Maharashtra BJP : पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच? बावनकुळेंच्या विधानानं महायुतीचं राजकारण तापणार

चार बैठकांमदून मोरे यांचे एकमेव नाव पुढे आले आहे. कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये त्यांना आज तरी पाठबळ दिले जात आहे. मोरे यांचे वडील किसन मोरे हे आमदार होते त्यामुळे त्यांच्या घराण्याला विधानसभेचे वलय आहे. अनेक वर्षापासून या मतदारसंघांमध्ये हात चिन्हच विधानसभेसाठी नसल्याने आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या चिन्हावर भरभरून मताधिक्य झाल्याने काँग्रेसमध्ये उभारी आले आहे.

ही संधी शोधूनच हे चिन्ह विधानसभेसाठी असावे असा एक मतप्रवाह तयार झाला आणि यातून मोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. एकीकडे आजी-माजी आमदारांच्यात कलगीतुरा रंगला असतानाच काँग्रेसचा नवा उमेदवार कितपत लोकांच्या पसंतीस पडतो आणि पुढे काय रंग घेणार की ऐनवेळेला आघाडीचा तिसराच उमेदवार राहणार हे लवकरच पुढे येईल. मात्र, सध्या तरी तिरंगी निवडणुकीचे चित्र दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com