Chandrakant Patil: महायुतीचं सरकार पुन्हा येऊ दे, सगळ्यांचं भलं होऊ दे! चंद्रकांत पाटलांचे श्री अंबाबाईला साकडं

Chandrakant Patil Visits Karveer Niwasini Ambabai Temple: सर्वांना सुख समृद्धी मिळावी महिला सुरक्षित व्हाव्यात यासाठी आई अंबाबाईकडे प्रार्थना केली. 1000 तरुणींना नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन आज घेतले. चंद्रकांत पाटलांनी श्री अंबाबाई देवीला साकडं घातलं. सर्वांना सुख समृद्धी मिळावी महिला सुरक्षित व्हाव्यात यासाठी आई अंबाबाईकडे प्रार्थना केली.

1000 तरुणींना नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नवरात्रीमध्ये महिलांचे सबलीकरण महिलांची सुरक्षा यासाठी काम करण्याची ताकद आई अंबाबाईने द्यावी, असे प्रार्थना करीत सरकार आल्याशिवाय राज्याची दिशा राज्याचे कायदे करता येत नाहीत. महायुतीचे सरकार येऊ दे , त्या सरकारमध्ये शेतकरी, कामगार, महिला सगळ्यांचे भलं होऊ दे, असं साकडं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देवीला घातले.

राजकारणात निवडणूक लढवण्याची महत्वकांक्षा, आपले नाते, आपले ध्येय याच्यावर विषय गेला तर तो माणूस निर्णय घेत असतो. पण भारतीय जनता पार्टीत आम्हाला असे वाटले की अन्याय झाला तरी आपण पक्ष सोडायचा नसतो. पण हे सगळेच करतील असं नाही हर्षवर्धन पाटील यांचे वेगळं असू शकतं. हर्षवर्धन पाटील पक्ष सोडतील असा सिग्नल मला मिळालेला नसल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

मी कोणतीही बैठक चार भिंतीच्या आतमध्ये करत नाही. मी मंदिरात बैठक घेतो, रेल्वे स्टेशनवर बसून फाईलवर सही करतो.चार भिंतीचा अनुभव कदाचित त्यांच्या नेत्याबद्दल असेल. बैठकीत त्यांचं म्हणणं मांडायचा असेल तर ऐकून घेतलं जाईल, असे कोळी समाजाच्या बैठकीवर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Chandrakant Patil
Ajit Pawar: माफी मागा! मुलींविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या आमदाराला अजितदादांनी दिली समज

लोकसभेचे विरोधी नेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा उद्यापासून कोल्हापूर दौरा आहे. त्या दौऱ्यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी, कोणी कुठंही जावं हा अधिकार लोकशाहीने दिला आहे. तसं कोणाच्या विरोधात निदर्शनं करावं हा देखील अधिकार लोकशाहीने दिला आहे. संविधान बदलणार असं नॅरेशन तयार करून आम्हाला थोडं बॅकफूटला नेलं, पण तो विषय लोकांच्या लक्षात आला. पण तुम्ही लंडनमध्ये जाऊन म्हणालात की माझं सरकार आलं की आरक्षण रद्द करणार. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात जिथं जिथं शक्य आहे तिथं निषेध व्यक्त करू. आम्ही कार्यक्रम उधळणार नाही पण आम्हाला आमचा विरोध करू द्यावा.

पोलिसांनी कायदा सुव्यवस्था म्हणून जे जे करायचं आहे. ते करा पण कुणाला डिटेन करू नका.आमच्या मोदींसमोर सगळे निदर्शने करतात ना? त्यामुळे तो लोकशाहीने दिलेला अधिकार आहे.त्यामुळे आम्हाला निषेध करू द्या. मी काँग्रेसचे संयोजक सतेज पाटील यांना विनंती करतो की त्यांनी राहुल गांधींना सांगावं तुम्ही जे बोलला त्याची रिऍक्शन कोल्हापुरात असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

Chandrakant Patil
Bhausaheb Bhoir: अजितदादांनी सरड्यांचे डायनासोर तयार केले; साथ सोडतानाच भाऊसाहेब भोईर बरसले! VIDEO पाहा

चंदगडचे शिवाजी पाटील हे देवेंद्र फडणवीस, माझे जवळचे मित्र आहेत ते पक्ष सोडतील असं वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. पुणे येथील अत्याचारावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. लहान मुली, महिलांवरील अत्याचार ही फार मोठी विकृती आहे. त्याला कायद्यानेच ठेचावे लागेल.त्यासाठी अधिकाधिक कडक कायदे करण्याचा सरकार विचार करीत आहे.

मोठे राजे, संभाजीराजे, मालोजीराजे यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे. पण संभाजीराजे राजे यांना आठवण करून देतो की अरबी समुद्रातील स्मारकासाठी या आधीच्या सरकारने काहीच केलं नव्हते. देवेंद्र फडणवीस यांनी परवानग्या आणल्या, डिझाईन तयार केलं, टेंडर निघालं, 25 टक्के काम झालं आणि स्टे आला. ज्यांनी केस घातली आहे, त्याला घेराव घाला आणि केस मागे घ्यायला लावा, लगेच काम सुरू होईल, असा सल्ला संभाजीराजे छत्रपती यांना चंद्रकांत पाटील यांनी दिला.

महायुती मधील जागा वाटपावर बोलताना, देवेंद्र फडणवीस यांना जागा वाटपाबाबत जबाबदारी आहे. ते, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी बोलत आहेत. ती चर्चा झाली की जागा वाटपाची माहिती समोर येईल. कोथरूड विधानसभा लढवता लढवता मला पश्चिम महाराष्ट्रातील मुरलीधर मोहोळ आणि धनंजय महाडिक यांना मार्गदर्शन करायचं आहे. भाजपकडे 112 जागा असता आणि इतरांच्या 50 आणि 40 असताना नैसर्गिकरित्या आम्हालाच जास्त जागा मिळणार, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com