Rajendra Patil Yadravkar: वडिलांची लढाई आता पुत्र लढणार! यड्रावकर अन् पाटलांमुळे शिरोळ पुन्हा बनले 'मैदान-ए-जंग'

Shirol Assembly Constituency: स्व. शामराव पाटील यड्रावकर यांचे सुपुत्र राजेंद्र पाटील यड्रावकर आणि स्व.सारे पाटील यांचे सुपुत्र गणपतराव पाटील या दोघांमध्ये प्रमुख लढत होणार आहे.
Kolhapur News
Kolhapur News Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: राज्यातील सत्ता बदलामुळे जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम झाला. आदलाबदलीमुळे झालेल्या घोळ्यांमुळे अनेकांनी सोयीची वाट धरली. त्यातून निर्माण झालेल्या राजकीय पेचाला सामोरे जात अनेक जण निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभा मतदारसंघातील हेच चित्र आहे.

कधीकाळी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी (NCP) अशी लढत होत असलेल्या मतदारसंघात पंचवीस वर्षांनी वडिलांनंतर दोन सुपुत्रांमध्ये लढत होत आहे. स्व. शामराव पाटील यड्रावकर यांचे सुपुत्र राजेंद्र पाटील यड्रावकर आणि स्व.सारे पाटील यांचे सुपुत्र गणपतराव पाटील या दोघांमध्ये प्रमुख लढत होणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने 1999 नंतर पहिल्यांदाच पाटील- यड्रावकर हे एकमेकांसमोर येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळीक असलेले आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे निवडून आल्यानंतर शिवसेनेला पाठिंबा दिला. तर आघाडी आणि स्वाभिमानीमुळे गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला शिरोळ विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस पासून दुरावला.

Kolhapur News
Rohit Patil : आर आर आबांच्या मुलाविरोधात एकाच नावाचे तीन उमेदवार; जयश्री पाटलांपुढेही नवे संकट!

गेल्या अडीच वर्षांपासून राज्यात झालेल्या सत्ता बदलामुळे महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राजर्षी शाहू आघाडीतून राजेंद्र पाटील यड्रावकर हे पुन्हा निवडणुकीला सामोरे गेले आहेत. जागा वाटपात काँग्रेसने बाजी मारत त्यांच्याकडून गणपतराव पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले. या दोघांमध्ये प्रमुख लढती होणार आहेत.

Kolhapur News
Ajit Pawar : आर. आर. आबांच्या बालेकिल्ल्यात अजितदादा गटाची एन्ट्री; स्थानिक नेता गळाला

1999 वेळी विधानसभा निवडणुकीत स्वर्गीय सारे पाटील आणि शामराव पाटील यड्रावकर यांच्यात लढत झाली होती. या लढतीत सारे पाटील यांनी विजय मिळवला होता. त्यामुळे सारे पाटील यांच्या सुपुत्राचा पराभव करत राजेंद्र पाटील यड्रावकर हे पराभवाचा वचपा काढणार का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. तत्पूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उल्हास पाटील यांनी उमेदवारी अर्ज केल्याने त्याचा फटका कोणाला बसणार? याचे भवितव्य निकालावरच अवलंबून आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com