CM Eknath Shinde: लाडक्या बहिणींनी सुरक्षा कवच तोडलं; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात पोलिसांची धावपळ! नेमकं काय झालं?

CM Eknath Shinde visit kolhapur:अनुकंपा तत्त्वावर काम करणाऱ्या कामगारांना कायम करावं, अशी मागणी करीत केएमटीच्या महिला वाहकाने थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली. महिला कर्मचाऱ्यांनी पोलिस संरक्षण तोडत स्टेजकडे धाव घेतल्याने पोलिसांची धावपळ उडाली.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल (बुधवारी) कोल्हापूर दौऱ्यावर (CM Eknath Shinde) होते. रात्री उशिरा कोल्हापुरातील दसरा चौक येथील उद्घाटन सोहळा संपल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या सुरक्षेत कसूर (security) असल्याची घटना घडली. कोल्हापूर महापालिकेच्या केएमटी विभागात अनुकंप तत्त्वावर काम करत असलेल्या महिलांनी सुरक्षा कवच भेदत आपले गाऱ्हाणे मुख्यमंत्री शिंदे यांच्या समोर मांडली.

जिल्हा पोलीस अधिकारी समोर असतानाच हा प्रकार घडला. यावेळी माध्यम प्रतिनिधींना शूटिंग करत असताना सबंधित पोलीस अधिकाऱ्याने दरडावले. मात्र झालेल्या प्रकारामुळे पोलीस कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या (eknath shinde visit kolhapur) दौऱ्यातील पोलिसांचा बेजबाबदारपणा दिसून आला. कोल्हापुरातील दसरा चौकात काल मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा झाल्यानंतर हा प्रकार घडला.

आपल्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका परिवहन विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची सुरक्षा भेदली. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांची एकच तारांबळ उडाली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाकडे अनुकंपा तत्त्वावर काम करणाऱ्या कामगारांना कायम करावं, अशी मागणी करीत केएमटीच्या महिला वाहकाने थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली. संबंधित महिला कर्मचाऱ्यांनी पोलिस संरक्षण तोडत स्टेजकडे धाव घेतल्याने पोलिसांची धावपळ उडाली.

CM Eknath Shinde
Ratan Tata death LIVE Updates: चाहत्यांना धन्यवाद! रतन टाटा यांची अखेरची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल......

मुख्यमंत्र्यांनी यातील एका महिलेची भेट घेतली. यावेळी संबंधित महिला कर्मचाऱ्यांनी रडतच आपली व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. दरम्यान या सर्व घटनेमुळे पोलिसांवरच सुरक्षा बाबत शंका उपस्थित होत. दरवेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्या वेळी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सभा आणि कार्यक्रम स्थळी येणाऱ्या नागरिकांना तपासणी आणि चौकशी करूनच सोडले जाते. यावेळी मात्र पोलिसांचा बेजबाबदारपणा दिसून आला. शिवाय गुप्तचर विभाग याप्रकाराबाबत बेदखल होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com