Kolhapur Politics : मुश्रीफांच्या खंद्या समर्थकाला दणका; 'भूविकास'च्या थकबाकीमुळे युवराज पाटील 'आऊट'..

Hasan Mushrif Kolhapur Political News : ज्या बँकेची थकबाकी, त्याच बँकेची उमेदवारी..
Kolhapur Politics :
Kolhapur Politics : Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे खंदे समर्थक आणि संघाचे माजी अध्यक्ष युवराज पाटील यांचा उमदेवारी अर्ज आज अपात्र ठरविण्यात आला आहे. भू-विकास बँकेचे थकबाकीदार म्हणून त्यांना सहकारी संस्थांची निवडणूक लढवण्यास मज्जाव करण्यात आला आहे. हाच निकष घेऊन जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी पाटील यांच्यासह एम. एम. पाटील यांचाही उमदेवारी अर्ज अपात्र ठरवला आहे. (Latest Marathi News)

शेतकरी संघाच्या निवडणुकीत 19 जागांसाठी विविध गटांतून 292 जणांनी 332 उमदेवारी अर्ज दाखल केले आहेत. काल (ता. 26) जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांच्यासमोर सुनावणी झाली. यामध्ये यशोधन शिंदे यांनी युवराज पाटील आणि एम. एम. पाटील यांच्या अर्जावर हरकत घेतली. युवराज पाटील यांनी भू-विकास बँकेचे कर्ज थकीत ठेवल्यामुळे त्यांना सहकारी संस्थांची पुढील निवडणूक लढवण्यास सहा वर्ष बंदी घातली होती.

2017 मध्ये ही बंदी लागू केली होती. त्यानुसार आता पाच वर्षेच पूर्ण झाली आहेत. त्यामुळे श्री. पाटील यांचा उमेदवारी अर्ज अपात्र ठरवावा, अशी मागणी शिंदे यांनी केली होती. त्यानुसार आज युवराज पाटील यांच्यासह एम. एम. पाटील यांचा अर्ज अपात्र ठरवला आहे. जयसिंग हिर्डेकर यांचा अर्ज पात्र ठरवला आहे. संघाच्या निवडणुकीत आता 291 उमेदवार असून माघार कोण कोण घेणार? याकडे लक्ष लागले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com