Assembly Winter Session : शिवसेनेचे कोणते आमदार होणार अपात्र, मुदतीपुर्वीच लागणार निकाल!

Rahul Narwekar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार अंतिम सुनावणी
Eknath shinde, Rahul narvekar, uddhav thackeray
Eknath shinde, Rahul narvekar, uddhav thackeraysarkarnama
Published on
Updated on

MLA disqualification hearing : महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवून उद्धव ठाकरेंचे सरकार एकनाथ शिंदेंनी पाडले. मात्र, या सत्तेच्या राजकारणात शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांकडून आमदारांना व्हिप देण्यात आला होता. कोणाचा व्हिप अधिकृत यावरून आमदारांना अपात्र ठरवण्या संदर्भात सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेत आहेत. 30 डिसेंबरच्या आधी ही सुनावणी संपवण्याचे निर्देश पुर्वीच सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिले होते. मात्र, ज्या प्रकारे सुनावणी सुरू आहे ते पाहता 30 डिसेंबरच्या आधीच आमदार अपात्रतेचा निकाल लागेल.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर आमदार अपात्रतेसंदर्भात सुनावणी सुरू आहे. विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या वकिलांना उलटतपासणी मंगळवार (ता.12) पर्यंत संपवण्याचे निर्देश दिले आहेत. उद्या शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे आणि सर्वात शेवटी भरत गोगावले यांची उलटतपासणी होणार आहे.

Eknath shinde, Rahul narvekar, uddhav thackeray
Assembly Winter Session : सत्ताधारी अजित पवार गटाच्या नेतेमंडळीना केले जातेय लक्ष्य; विरोधकांकडून हल्लाबोल

बुधवारी (ता.13) ते शुक्रवार (ता.15) या कालावधीत लेखी युक्तिवाद होणार आहे. त्यानंतर 16 डिसेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत विधानसभा अध्यक्ष अंतिम सुनावणी घेतील. त्यामुळे न्यायालयाने सुनावणी 30 डिसेंबरच्या आधी संपवण्यास सांगितले असते. अंतिम सुनावणी 10 दिवस आधीच संपते आहे. त्यामुळे 20 डिसेंबर नंतर विधासभा अध्यक्ष निर्णय घेऊ शकतात.

आत्तापर्यंत झालेल्या सुनावणीमध्ये दोन्ही गटाकडून विविध पुरावे सादर करत आपलाच व्हिप योग्य असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न केलाय. आमदारांच्या उलटतपासणीमध्ये काही आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या सोबत झालेल्या बैठकीला उपस्थित नसल्याचा पवित्रा घेतला. तर, उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांकडून बैठकीला हजर असल्याबाबतचे हजेरी पत्रकच सादर केले. हजेरी पत्रकारवर आपली सही बनावट असल्याचा दावा देखील एका आमदाराने केले.

Eknath shinde, Rahul narvekar, uddhav thackeray
Rajesh Kshirsagar News : वडिलांना मारहाण होताना पाहून माजी आमदाराशी भिडणाऱ्या शौर्यचा सत्कार!

विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर कोणते आमदार अपात्र ठरणार याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत. या निकाला नंतर राज्य सरकाराला धोका निर्माण होणार नसल्याचे सांगितले जात आहे. अजित पवार यांना आपल्या सत्तेत सहभागी करून घेत सरकार बहुताच्या आकड्यापेक्षा किती तरी पुढे आहे. मात्र, विधानसभा अध्यक्षांचा निर्णय हा राजकारणाची दिशा बदलेले असे सांगितले जात आहे.

Edited by Roshan More

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com