Mahesh Jadhav, Krishnaraj Mahadik, Nana Kadam, Rahul Chikode
Mahesh Jadhav, Krishnaraj Mahadik, Nana Kadam, Rahul ChikodeSarkarnama

Kolhapur Politics : दक्षिण व्हाया उत्तर मिळवण्यासाठी 'मास्टर प्लॅन', महायुतीत दोस्तीत कुस्ती

Kolhapur Mahayuti Politics Shivsena BJP NCP : आगामी विधानसभा निवडणूक एकत्र लढण्यावर एकमत झाल्यास कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ कोणाकडे जाणार? याची उत्सुकता लागून राहिली असताना खासदार धनंजय महाडिक यांच्या दाव्याने आतापासूनच दोस्तीत कुस्ती रंगण्यास सुरुवात झाली आहे.
Published on

Kolhapur News, 20 July : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीत अर्धा डझनभर उमेदवारांची भाऊगर्दी आहे. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावर शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे टेन्शन वाढवलं आहे.

आगामी विधानसभा निवडणूक (Assembly Elections) एकत्र लढण्यावर एकमत झाल्यास कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ कोणाकडे जाणार? याची उत्सुकता लागून राहिली असताना खासदार धनंजय महाडिक यांच्या दाव्याने आतापासूनच दोस्तीत कुस्ती रंगण्यास सुरुवात झाली आहे.

भाजपकडून (BJP) चौघेजण तर शिवसेना शिंदे गटातून एक उमेदवार इच्छुक असल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढणार हे निश्चित आहे. शिवाय कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील राजकीय अंदाज घेऊन शिवसेना शिंदे गटाने कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात दबाव गट तयार करून उत्तरेत पाय घट्ट रोवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी पत्रकार परिषदेत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावर भाजपसाठी दावा केला आहे. कोल्हापूर उत्तरच्या पोट निवडणुकीत भाजपने जवळपास 80 हजार इतकी मते घेतल्यानंतर प्रखरपणे भाजपकडून दावा केला जात आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर असल्याने पोटनिवडणुकीत शिवसेनेने माघार घेतली होती.

Mahesh Jadhav, Krishnaraj Mahadik, Nana Kadam, Rahul Chikode
Ajit Pawar : अजितदादांचा शरद पवार गटाच्या प्राजक्त तनपुरेंवर डोळा; सभागृहात नेमकं काय घडलं?

तर सध्या शिवसेना शिंदे गट भाजपसोबत असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपने या जागेवर दावा कायम केला आहे. भाजपकडून कोल्हापूर महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, भाजपचे महेश जाधव, माजी नगरसेवक सत्यजित उर्फ नाना कदम आणि धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक हे कोल्हापूर उत्तर मधून लढण्यास इच्छुक आहेत.

महायुतीत ही जागा भाजपने दावा केल्याचा अंदाज ओळखूनच गेल्या दीड वर्षांपासून राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दक्षिणेत हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये ठिकठिकाणी पदाधिकारी निवडून आणि मेळावे आयोजित करत कार्यकर्त्यांना हाताशी धरले आहे.

सार्वजनिक तरुण मंडळांना देणग्या, उपनगरातील विकास कामासंदर्भात बैठका घेत भाजपवर दबाव वाढवण्याचे काम सुरू केलं आहे. एकंदरीतच विधानसभा निवडणुकीच्या वेळी कोल्हापूर दक्षिणमध्ये दबाव गट तयार करून उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये सॉफ्ट कॉर्नर घेण्याची राजेश क्षीरसागर यांची मानसिकता दिसते.

Mahesh Jadhav, Krishnaraj Mahadik, Nana Kadam, Rahul Chikode
Sharad Pawar On Dilip Walse : वळसे पाटलांच्या कन्या तुतारीवर लढणार? शरद पवारांनी जाग्यावरच विषय मिटवला

पोट निवडणुकीत नेमकं काय झालं?

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोट निवडणूक लागली. त्यावेळी महाविकास आघाडी अस्तित्वात असल्याने काँग्रेसकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांना राष्ट्रवादी आणि शिवसेनेने पाठिंबा दिला होता.

तर भाजपकडून माजी नगरसेवक सत्यजित कदम हे निवडणुकीच्या रिंगणात होते. काँग्रेस आणि भाजप अशी लढत झाली. यात महाविकास आघाडीचे उमेदवार जयश्री जाधव या विजयी झाल्या. तर भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांनी 80 हजार इतकी मते मिळवली. याचाच आधार घेत या विधानसभा निवडणुकीत भाजप या मतदारसंघावर दावा करणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com