Satej Patil : कोल्हापुरच्या रस्त्यावरून सतेज पाटलांनी डिवचलं, 'तरी धन्यता...' म्हणताच क्षीरसागरांचाही पलटवार

Satej Patil Vs Rajesh Kshirsagar : कोल्हापूर शहरातील रत्यांवरून सध्या वाद उफाळताना दिसत आहे.
Kolhapur road project controversy; Rajesh Kshirsagar And Satej Patil
Kolhapur road project controversy; Rajesh Kshirsagar And Satej Patilsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. कोल्हापूर शहरातील 100 कोटींच्या रस्ते प्रकल्पावरून सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत चौकशीची मागणी केली.

  2. महापालिका निवडणुकीपर्यंत रस्ते टिकतील का, असा टोला सतेज पाटील यांनी लगावला.

  3. यावर आमदार राजेश क्षीरसागर यांनी कुठल्याही मंचावर चर्चा करण्याचं ओपन चॅलेंज दिलं.

Kolhapur News : कोल्हापूर शहरातील रत्यांवरून नवा वाद सुरू झाला असून 100 कोटींच्या रस्ते प्रकल्पावरून विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी याबाबत विधीमंडळातच प्रश्न विचारत या रस्ते प्रकल्पाच्या चौकशीची मागणी केलीय. तसेच महापालिकेच्या निवडणुकीच्या मतदानापर्यंत तरी हे रस्ते टिकले तरी धन्यता मानवी लागेल असा टोलाही त्यांनी लगावलाय. यानंतर आता कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी जोरदार पलटवार केला आहे. त्यांनी कुठल्याही मंचावर या सर्व प्रश्नांना उत्तर द्यायला आपली तयारी असल्याचे म्हणत सतेज पाटलांना ओपन चॅलेंज दिले आहे. सध्या या आरोप-प्रत्यारोपासह ओपन चॅलेंजची कोल्हापुरसह राज्यभर चर्चा सुरू आहे.

सध्या कोल्हापूर शहरात 100 कोटींचा रस्ते प्रकल्प सुरू आहे. पण अनेक ठिकाणी फक्त डांबरावर बारीक खडी मारत शहरवासियांच्या डोळ्यात धुळ घालण्याचे काम केलं जात आहे. खडी उखडून गेल्यानंतर जे खडे होते. त्यांचे दर्शन शहरवासियांना पुन्हा होताना दिसत आहेत. तर शहराच्या इतर भागात खड्ड्यांचे साम्राज्य आहे. यावरूनच सध्या शहराच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहे.

अशातच शनिवारी (ता.14) शहरातील स्ते प्रकल्पावरून विधान परिषदेत सतेज पाटील यांनी प्रश्न उपस्थित करत जोरदार हल्लाबोल केला. तसेच त्यांनी या प्रकल्पाच्या चौकशीची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच केली. यावेळी सतेज पाटील यांनी, कोल्हापुरात 100 कोटींच्या रस्त्यांचा प्रकल्प सुरू आहे. पण याची चौकशी होणं गरजेचं आहे. दरम्यान रस्त्यांच्या दर्जावरून देखील सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल झालीय. याच्या कामावरून न्यायालयाने ताशेरे ओढलेत.

Kolhapur road project controversy; Rajesh Kshirsagar And Satej Patil
Kolhapur Politics : तीन नगरपालिकांचा निकाल कागलमध्ये गेम फिरवणार, 8 मतदारसंघांसह मुश्रीफ- घाटगे युतीची धाव कुठपर्यंत हे ठरवणार ?

शिंदे साहेब यांनी चांगल्या मनाने निधी मंजूर करून दिला. 100 कोटी दिले, त्याबद्दल मी आभार मानतो. मात्र रस्त्यांची गुणवत्ता व्यवस्थित नाही. या रस्त्यांची गुणवत्ता राहिलेली आहे का? याचा विचार करण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी या रस्त्यांची स्थिती पाहिली असता ते 60 कोटींचे सुद्धा नाहीत. जे वास्तव आहे. तर हे रस्ते पुढील पावसाळ्यापर्यंतही टिकणारे नसून महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत मतदानापर्यंत टिकले तरी धन्यता मानवी लागेल, अशी खोचक टीका केलीय.

यावर आता क्षीरसागर यांनी जोरदार पलटवार केला असून त्यांनी, सतेज पाटलांना माझं खुलं आव्हान आहे. त्यांनी कुठल्याही मंचावर यावं, आपण त्यांना त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तर द्यायला तयार आहोत. ते विचारत आहेत की किती प्रकल्प आणले? पण त्यांनी किती प्रकल आणले? सतेज पाटलांनी फक्त स्वतःचे उद्योग वाढवले, बाकीच काहीच केलं नाही, असं खरमरीत उत्तर क्षीरसागर यांनी दिलं आहे.

Kolhapur road project controversy; Rajesh Kshirsagar And Satej Patil
Kolhapur Politics : कोल्हापूरच्या हद्दवाढीचा वाद कोणाची ‘वाढ’ रोखणार? थेट मतदानावर बहिष्काराचा इशारा  

FAQs :

1. कोल्हापूरमध्ये कोणत्या प्रकल्पावरून वाद सुरू आहे?
100 कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पावरून वाद सुरू आहे.

2. सतेज पाटील यांनी काय मागणी केली आहे?
रस्ते प्रकल्पाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

3. राजेश क्षीरसागर यांनी काय प्रतिक्रिया दिली?
सर्व आरोपांना उत्तर देण्यासाठी ओपन चॅलेंज दिलं आहे.

4. हा मुद्दा कुठे उपस्थित करण्यात आला?
महाराष्ट्र विधानपरिषदेत.

5. या वादाची चर्चा का वाढली आहे?
मोठ्या आर्थिक प्रकल्पाशी संबंधित आरोप आणि ओपन चॅलेंजमुळे राज्यभर चर्चा सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com