Kolhapur Bribe Case : 5 लाखांचं लाच प्रकरण शाहूवाडी तहसीलदाराच्या अंगलट; शिंदेंच्या आमदारांने थेट विधानसभेत केली 'ही' मोठी मागणी

Shahuwadi Tehsildar Ramling Chavan : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तहसीलदार यांच्या नावाने पाच लाखाची खंडणी मागून वसुली करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती. मात्र तहसीलदार चव्हाण यांनी या आरोपाचे खंडन केले होते.
Kolhapur Bribe Case
Kolhapur Bribe CaseSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 26 Mar : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी (Shahuwadi) तालुक्यातील तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तहसीलदार यांच्या नावाने 5 लाखाची खंडणी मागून वसुली करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती. मात्र तहसीलदार चव्हाण यांनी या आरोपाचे खंडन केले होते.

मात्र, आता राजकीय पक्षांनी देखील तहसीलदार रामलिंग चव्हाणांची चौकशी करून त्यांना सहआरोपी करा, अशी मागणी केली आहे. दरम्यान या प्रकरणावर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांनी आक्रमक होत थेट विधानसभेतच त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या संदर्भातील शासनाने केलेल्या कारवाया संदर्भातील भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी सुर्वे यांनी केली.

तहसीलदार चव्हाण यांच्या नावाने सुरेश खोतला एका तक्रारदाराकडून पाच लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं होतं. खोतने ज्यांच्यासाठी लाच मागितली होती. त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी आता सर्वच राजकीय पक्षांकडून होताना दिसत आहे.

Kolhapur Bribe Case
Ajit Pawar : "माझं ऐकलं की राजकारणात फायदाच होतो..."; अजितदादा विश्वजीत कदम अन् अमित देशमुखांचा पत्ता ओपन करता करता राहिले...

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेसह (Shivsena) शेतकरी संघटनेकडून तहसीलदार चव्हाण यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे. विधानसभा सभागृहात आमदार प्रकाश सुर्वेंनी शाहूवाडीचे तहसीलदार चव्हाण यांच्याबाबत लक्षवेधी मांडली.

यावेळी खोत याने ज्यांच्यासाठी लाच मागितली. त्यांच्यावर कोणती कारवाई केली याबाबत शासनाने भूमिका स्पष्ट करावी. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ती मागणी मान्य करत पुण्याचे विभागीय आयुक्त यांना कनिष्ठ अहवाल पाठवण्याचे आदेश दिले आहेत. तहसीलदार चव्हाण यांच्याबाबत मनसे देखील आक्रमक झाली आहे.

Kolhapur Bribe Case
Jayant Patil News : नार्वेकरांच्या मनपरिवर्तनासाठी जयंत पाटलांची बॅटिंग; भास्कर जाधवांचा निर्णय आजच होणार?

तहसीलदार चव्हाण यांची चौकशी करून त्यांना या प्रकरणात सहआरोपी करावे. तसेच त्यांना शासकीय सेवेतून निलंबित करावे अशी मागणी त्याचे उपजिल्हाध्यक्ष विशाल मोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील आक्रमक पवित्रा घेत लाचखोरी प्रकरणात तहसीलदार चव्हाण यांना सहआरोपी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com