Kolhapur South Assembly : ऋतुराज पाटलांच्या विजयाचे संकेत? ‘अंडरकरंट’चा शॉक कुणाला?

Ruturaj Patil election victory signals in Kolhapur South: कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात यंदा मतदारांचा टक्केवारी मागील निवडणुकीपेक्षा जेमतेमच राहिली आहे. केवळ अर्धा टक्का मतदार यंदा वाढला आहे.
Ruturaj Patil, Amal Mahadik
Ruturaj Patil, Amal MahadikSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील लढत राज्यात चर्चेचा विषय ठरली. एकमेकांचे कट्टर वैरी असलेल्या महाडिक आणि पाटील गटात थेट लढत झाली आहे. काँग्रेसकडून आमदार ऋतुराज पाटील तर भाजपकडून अंमल महाडिक हे निवडणुकीच्या रिंगणात होते. दोन्हीही गटाकडून यंत्रणा आणि प्रचारात आघाडीवर राहिल्याने येत्या 24 तासांत कोणाच्या बाजूने कौल लागणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

एकंदरीतच कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पारडे सध्या जड असले तरी शासकीय योजनांचे लाभार्थी, लाडकी बहीण आणि हिंदुत्वाचा अंडरकरंट नेमका काय आहे? हे निकालानंतरच समजणार आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात यंदा मतदारांचा टक्केवारी मागील निवडणुकीपेक्षा जेमतेमच राहिली आहे. केवळ अर्धा टक्का मतदार यंदा वाढला आहे.

Ruturaj Patil, Amal Mahadik
Karad North Assembly Election : बाळासाहेब पाटील परंपरा कायम ठेवणार, 'साम'चा सर्व्हे काय सांगतो ?

दक्षिण विधानसभा मतदारसंघात यंदा शासकीय आकडेवारीनुसार 75.70 टक्के मतदान झाले. म्हणजेच पुरुष 1,42,707  तर महिला मतदार 1,39,007 असे एकूण 2,81,743 मतदारांनी मतदान केले आहे. गत निवडणुकीच्या तुलनेत यावेळी महिलांच्या टक्केवारीचे प्रमाण वाढलेले आहे.

एक्झिट पोल नुसार, कोल्हापूर दक्षिण मधील लढाई ही महाडिक आणि पाटील गटात थेट झाल्याने जनतेचा कौल सध्या तरी काँग्रेसच्या बाजूने दिसत आहे. आतापर्यंत दक्षिणच्या इतिहासात केवळ एक वेळेस इतर आमदारांना संधी मिळाली आहे. काँग्रेसचे दक्षिण मधील असलेले कार्यकर्त्यांचे जाळे, संघटन आणि विकासकामांना घेऊन पुढे जात असलेल्या आमदार ऋतुराज पाटील यांना जनता कौल देईल असे एकंदरीत चित्र आहे.

Ruturaj Patil, Amal Mahadik
Vidhansabha Election Exit Poll 2024 : मोनिका राजळेंनी वारं फिरवलं? 'एक्झिट पोल'नुसार हॅटट्रिक निश्चित...पाहा VIDEO

ग्रामीण आणि शहरी भागात हा मतदारसंघ विभागला गेल्याने त्याचा फायदा काँग्रेसला होईल, अशी शक्यता आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत जवळपास काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. शहरी भागात भाजपची कमांड आहे. लाडकी बहीण आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर शहरी भागात भाजप मुसंडी मारू शकतो. एकंदरीतच पाहता सध्यातरी जनतेचा कौल काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या बाजूनेच दिसतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com