Kolhapur South Constituency: ऋतुराज पाटील अन् अमल महाडिकांना अपक्षांचा धोका, भाजपचे जाळे भेदण्याचे काँग्रेसपुढे आव्हान

Ruturaj Patil vs Amal Mahadik : गेल्या विधानसभा निवडणुकीत 43 हजाराची मताधिक्य मिळवणारे आमदार ऋतुराज पाटील यांना यंदाची विधानसभा निवडणूक तितकी सोपी नाही. अपक्षांचा फटकाच अमल महाडिक किंवा ऋतूराज पाटील यांना बसण्याचा अंदाज आहे.
Ruturaj Patil vs Amal Mahadik
Ruturaj Patil vs Amal MahadikSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: गेल्या विधानसभा निवडणुकीत 43 हजाराची मताधिक्य मिळवणारे आमदार ऋतुराज पाटील यांना यंदाची विधानसभा निवडणूक तितकी सोपी नाही. लोकसभा निवडणुकीत घटलेले मताधिक्य हे विद्यमान आमदारांना धोक्याची घंटा होती. गेल्या पाच वर्षापासून पुलाखालून वाहिलेले पाणी आणि भाजपचे वाढलेले संघटन आणि सत्ताधारी सरकारच्या मदतीने भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी केलेली विकास कामामुळे दक्षिण भेदण्याचे आव्हान आमदार ऋतुराज पाटील यांच्यासमोर असणार आहे.

दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा तुल्यबळ आणि आर्थिक दृष्ट्या न परवडनारा असलातरी जवळपास नऊ अपक्ष दक्षिणच्या रिंगणात आहेत. होणारी निवडणूक ही दहा ते पंधरा हजारांच्या फरकातच उमेदवाराला विजयी करणार आहे. त्यामुळे या अपक्षांचा फटकाच अमल महाडिक किंवा ऋतूराज पाटील यांना बसण्याचा अंदाज आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांना कोल्हापूर दक्षिणमध्ये कमी मताधिक्य देण्यात भाजपचे अमल महाडिक हे यशस्वी झाले. विधानसभा निवडणुकीत 43 हजाराचे मताधिक्य घेणाऱ्या ऋतुराज पाटील यांनी केवळ काँग्रेसला 6 हजाराचे मताधिक्य दिले. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक हे काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जाते.

त्यामुळे दक्षिणच्या राजकारणात फोडाफोडीला ऊत आला आहे. दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची पळवा पळवी सुरू आहे. महाडिक गटाकडून कोल्हापूर उपनगरातील पाटील गटाचे कार्यकर्ते गळाला लावण्याची प्रयत्न सुरू आहेत. तर पाटील गटाकडूनही महाडिक गटाचे मताधिक्य असणारे कार्यकर्ते देखील गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही जणांची घर वापसी करण्याची तयारी सुरू झाली आहे.

Ruturaj Patil vs Amal Mahadik
Kolhapur Politics : मधुरिमाराजेंच्या माघारीला 2009 मधील मालोजीराजेंच्या ‘त्या’ पराभवाची किनार!

2019 च्या निवडणुकीत अमल महाडिक यांचा ऋतुराज पाटील यांनी 42 हजारांच्या मताधिक्याने पराभव केला असला तरी, या पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांना ही लढाई जिंकणे तितके सोपे नाही. भाजपचे उमेदवार अमल महाडिक आणि काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील (Ruturaj Patil) यांची या मतदारसंघात अग्निपरीक्षा आहे. त्यामुळे विधानसभेची लढाई दोन्ही उमेदवारांना सोपी नाही. आमदार सतेज पाटील यांचा या मतदारसंघातील लोकसंपर्क आणि कार्यकर्त्यांचे जाळे यामुळे भाजपला हा मतदारसंघ सहज जिंकता येणारा नाही.

Ruturaj Patil vs Amal Mahadik
Satej Patil: मधुरिमाराजेंची माघार, सतेज पाटील कार्यकर्त्यांसमोर रडले

कोल्हापूर शहरातील उपनगरातील झोपडपट्टी परिसर, दलित वस्ती आणि व्यक्तिगत संपर्क आणि संघटन यावर काँग्रेसची भिस्त आहे. शिवाय पाटील गटाकडे मतदान बाहेर काढण्यासाठी व्यक्तिगत यंत्रणा कार्यान्वित आहे. मात्र गत वेळी पराभव स्वीकारलेल्या अमल महाडिक यांनी पराभवाची कारणे शोधून गेल्या पाच वर्षांपासून रणनीती आखली आहे. सत्ताधारी सरकारकडून केलेली विकास कामे आणि सातत्याने ठेवलेला संपर्क त्यामुळे महाडिक गटांनी देखील बाजू भक्कम केली आहे.

भाजपकडून सतेज पाटील (Satej Patil) गटाला खिंडार पाडून तेथील नेते आपल्या बाजूला आणले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या डावाला भाजपने प्रतिडाव टाकला आहे. आता कोणाच्या डावावर कोण यशस्वी होणार, हे येणाऱ्या काळातील प्रचारच ठरवणार आहे. या मतदारसंघात 9 अपक्ष उमेदवार आहेत. मात्र, त्यांचा फारसा प्रभाव दिसत नाही. त्यामुळे त्यांच्यामुळे मतविभागणी होईल, अशी शक्यता फारशी नाही. खरी लढत ही महाडिक विरुद्ध पाटील यांच्यामध्येच होणार असून, पुढील चौदा दिवसांतील घडामोडींवरती आता जय-पराजय अवलंबून आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com