Kolhapur Sugarcane Protest : कोल्हापुरात संतप्त शेतकऱ्यांकडून CM फडणवीसांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न, ऊस आंदोलन पेटणार

CM Devendra Fadnavis Convoy Incident: मागील काही दिवसांपासून ऊस दराबाबत कारखानदार, शेतकरी संघटना आणि प्रशासन यांच्यात संघर्षाची स्थिती आहे. अशातच मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न केल्याने आंदोलन आणखी अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Devendra Fadnavis’s convoy
Police rush to control chaos in Kolhapur after farmers allegedly threw sugarcane sticks at CM Devendra Fadnavis’s convoy amid protests over sugarcane prices.Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 05 Nov : ऊस दराच्या प्रश्नावरून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाला आहे. काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत कारखानदारांनी पाठ फिरवल्याने शेतकरी संतापला आहे.

त्यामुळे ऊस आंदोलन पेटण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर आले असता अज्ञात शेतकऱ्यांनी त्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.

शेतकऱ्यांनी कांड्या फेकण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेमुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. मागील काही दिवसांपासून ऊस दराबाबत कारखानदार, शेतकरी संघटना आणि प्रशासन यांच्यात संघर्षाची स्थिती आहे. अशातच मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न केल्याने आंदोलन आणखी अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Devendra Fadnavis’s convoy
Uddhav Thackeray News : माझा शेतकरी भोळाभाबडा, सरकारकडून त्याची थट्टा! मराठवाडा दौऱ्यात उद्धव ठाकरे संतापले

दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा ताफा ज्या रस्त्याने जात होता तिथे घटनास्थळी कडक बंदोबस्त असतानाही पोलिसांच्या समोरच हा प्रकार घडला. अचानक घडलेल्या घटनेमुळे काही काळ पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन उसाच्या कांड्या बाजूला केल्या.

Devendra Fadnavis’s convoy
Eknath Shinde : 'एकनाथ शिंदे हे महिलांच्या मनातले मुख्यमंत्री...', भाजपच्या बड्या नेत्यासमोरच विधान परिषदेच्या उपसभापतींचं भुवया उंचावणारं वक्तव्य

आंदोलकांनी महामार्गावर उसाच्या कांड्या भरलेली पोती टाकून निषेध नोंदवला. एकरकमी एफआरपी आणि साखर कारखानदारांची आडमुठी भूमिका यावरून जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संताप उसळल्याचे बोलले जात आहे. आगामी काळात कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलन तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com