Eknath Shinde : 'एकनाथ शिंदे हे महिलांच्या मनातले मुख्यमंत्री...', भाजपच्या बड्या नेत्यासमोरच विधान परिषदेच्या उपसभापतींचं भुवया उंचावणारं वक्तव्य

Neelam Gorhe Book Launch : मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये नीलम गोऱ्हे यांच्या 'दाही दिशा' या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत देखील उपस्थित होते.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 05 Nov : शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदे यांचा 'महिलांच्या मनातले मुख्यमंत्री' असा उल्लेख केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये नीलम गोऱ्हे यांच्या 'दाही दिशा' या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत देखील उपस्थित होते.

तर भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील ज्या स्टेजवर होते त्याच स्टेजवर नीलम गोऱ्हेंनी एकनाथ शिंदेंचा उल्लेख 'महिलांच्या मनातले मुख्यमंत्री' असा केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. नीलम गोऱ्हे यांनी महिला सक्षमीकरण आणि नेतृत्वावर प्रकाश टाकणारं 'दाही दिशा' हे पुस्तक लिहिलं आहे.

Eknath Shinde
Raj Thackeray News : निवडणूक आयोगाची प्रेस पाहून राज ठाकरे भडकले; म्हणाले, हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं!

या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना त्या म्हणाल्या, 'मी दरवर्षी एक पुस्तक लिहिते, ज्यामध्ये महिला धोरण, स्त्री सशक्तीकरण असे विषय असतात. दारू विरोधात महिलांनी आंदोलनं केली, त्या प्रकरणात महिलांवर दाखल असलेले 32 हजार गुन्हे आमच्या सरकारच्या काळात मागे घेतले.

महिलांना येणाऱ्या अडचणी यावर मी मुंबई सकाळमध्ये एक सदर लिहित होते, त्या सर्व लेखांवर आधारीत हे पुस्तक आहे. टक्केवारी फक्त कामात नसते तर भाषणातही असते. त्यामुळे तुम्ही सविस्तर बोला.'

Eknath Shinde
Hadapsar Saswad Metro: पुण्यासाठी मोठी बातमी: हडपसर-सासवडकरांसाठी 'या' मार्गावरील मेट्रोबाबत महत्त्वाचा निर्णय

दरम्यान या कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदेंनी नीलम गोऱ्हेंचं कौतुक केलं. ते म्हणाले, 'आपल्या सगळ्यांची लाडकी बहीण नीलम गोऱ्हेंचं मी मनापासून अभिनंदन करतो. ज्ञानाचं खोरे म्हणजे निलम ताई गोऱ्हे, राजकारणात अनेक जण दिशाहीन झालेले असताना, नीलमताईंनी बाळासाहेबांच्या विचारांची दिशा पकडली आहे.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com