Kolhapur Drought : कोल्हापुरातील सर्वाधिक पाऊस पडणारे ६ तालुके दुष्काळग्रस्त! पन्हाळा ते चंदगडपर्यंत मिळणार विविध सवलती

Maharashtra Government Drought Relief : महाराष्ट्र सरकारने अखेर चिंता ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला असून राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.
Kolhapur Drought
Kolhapur DroughtSarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur Drought News : राज्यात यंदा झालेल्या कमी पावसामुळे खरीप हंगाम २०२६ वाया गेला आहे. लाखो शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. यामुळे अखेर राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी याबाबत शासन निर्णय काढला आहे. तर या २६५ तालुक्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यांचा समावेश आहे. या सहा तालुक्यांमध्ये ‘Trigger-1’ लागू करण्यात आला आहे. यामुळे शासन निर्णयानुसार येथे सरकारने घोषित केलेल्या विविध सवलती बाधितांना मिळणार आहेत.

धक्कादायक म्हणजे जिल्ह्यातील अति पावसाचे तालुके म्हणून ओळखे हे सहाही तालुके ओळले जातात. तरीही या सहा तालुक्यांमध्ये ‘Trigger-1’ लागू झाला आहे. यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या असून यावरून जिल्ह्यात प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भूदरगड, आजरा व चंदगड या तालुक्यांचा समावेश दुष्काळी तालुका म्हणून करण्यात आला आहे.

दरम्यान आता ‘Trigger-1’ लागू झाल्यामुळे दुष्काळग्रस्त भागासाठी शासनाने विशेष बाब म्हणून विविध सवलती व उपाययोजना लागू केल्या आहेत. यामध्ये जमीन महसूलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती तसेच ७.५ हॉर्सपॉवरपेक्षा अधिक क्षमतेच्या कृषी पंपांच्या चालू वीजबिलात सूट यांचा समावेश आहे.

Kolhapur Drought
Western Maharashtra Drought : पश्चिम महाराष्ट्रात 2004 च्या तुलनेत दुष्काळी तालुके दहांनी वाढले; आकडा 25 वरून 35 पोचला

याशिवाय शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेंतर्गत कामांच्या निकषांमध्ये शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरू करणे, आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची वीज जोडणी खंडित न करणे, शेतकरी व शेतमजुरांना अन्नधान्याची टंचाई भासणार नाही याची व्यवस्था करणे, जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देणे तसेच जलसंधारणाची कामे सुरू करणे आदी उपाययोजनांचा यामध्ये समावेश आहे.

सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची स्थिती दर्शविणारी छायाचित्रे व GPS कोऑर्डिनेट्स संकलित करून पीक परिस्थितीचा अहवाल शासनास सादर करण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेत पिकांच्या नुकसानीपोटी देण्यात येणारी आर्थिक मदत विहित कार्यपद्धती पूर्ण झाल्यानंतर स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात येणार असल्याचे या शासन निर्णयात नमूद आहे.

Kolhapur Drought
Maharashtra Drought : 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, पण कोकणावर अन्याय? ठाकरेंच्या शिलेदाराने फडणवीसांना सुनावले

शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे सर्वेक्षण व पंचनाम्याची कार्यवाही करण्यात येणार असून, बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या सवलती व मदतीचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून लवकरच आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com