

कोल्हापूर महानगरपालिकेसाठी महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत होत असताना आता तिसऱ्या आघाडीची स्थापना झाली आहे. महानगरपालिकेसाठी वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी यांनी तिसरी आघाडी स्थापन केली असून कोल्हापुरात 81 जागांवर उमेदवार दिले जाणार आहेत. येत्या 16 जानेवारीलाच महाविकास आघाडीला समजेल त्यांचा तोटा काय झाला असा इशारा यावेळी देण्यात आला. कोल्हापूरातच स्थापन झालेल्या तिसर्या आघाडीमुळे महायुती किंवा महाविकास आघाडीचा बाजार उठण्याची शक्यता आहे.
महापौर, खासदार, आमदार यांच्या घराघरात उमेदवारी दिली जात आहे. मग कार्यकर्त्यांनी नुस्ती धुणी धुवायची का? म्हणून कार्यकर्ता टिकला तर पक्ष टिकणार आहे. आम्ही कार्यकर्ता पॅटर्न म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी मिळावी. अशी आमची भूमिका आहे. यासाठी आम आदमी आणि वंचित बहुजन आघाडी, बसपा कोल्हापुर महानगरपालिका निवडणूक लढवणार अशी घोषणा आम आदमीचे नेते संदीप देसाई यांनी केली.
कोल्हापूर शहरातील डॉक्टर, शिक्षक, प्राध्यापक यांच्यासह कोणत्याही क्षेत्रातील कामगार यांनी या आघाडीकडे उमेदवारीसाठी यावे. त्यांना एक रुपयाही खर्च उमेदवारी घेण्यासाठी येणार नाही. स्वतःच्या खर्चातून आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही देसाई यांनी दिली.
विजयी संकल्प महासभेच्या माध्यमातून आम्ही यापूर्वी महानगरपालिकेचे रणशिंग फुंकले आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळेल. वंचित बहुजन आघाडी हे नेहमीच कार्यकर्त्यांसाठी आहे. त्यामुळे या आघाडीचा फायदा इतर पक्षांना न होता तो कार्यकर्त्यांना व्हावा या उद्देशाने तिसरी आघाडी स्थापन केल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे शहरा जिल्हाध्यक्ष अरुण सोनवणे यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देखील महाविकास आघाडीवर नाराज आहे. त्यामध्ये त्यांना समान धारक जागा मिळत नसल्याने ते देखील आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहेत. त्यांना तिसऱ्या आघाडीत घेण्यासाठी आमची चर्चा सुरू आहे. मात्र ती चर्चा पुढे गेलेली नाही. जर महाविकास आघाडीमध्ये त्यांची नाराजी दूर झाली तर शरद पवार साहेब यांना शोभेल अशा जागा त्यांनी मिळवून घ्याव्यात, असेही अरुण सोनवणे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.