Kolhapur Politics K P Patil doesn't want to be Patil What exactly is said in 'that' letter
K P PatilSarkarnama

Kolhapur Politics : के. पी. पाटील कुणाला झालेत नकोसे? 'त्या' पत्रात नक्की म्हटलंय काय?

Kolhapur Vidha Sabha Election Politics : राधानगरीसाठी कसरत करणारे के. पी. पाटील कुणाला झालेत नकोसे? विधानसभा निवडणुकीपूर्वीच ऐन पावसाळ्यात राधानगरी विधानसभा मतदारसंघातील वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.
Published on

Radhanagari Politics : विधानसभा निवडणुकीपूर्वीच ऐन पावसाळ्यात राधानगरी विधानसभा मतदारसंघातील वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीला मिळालेल्या मताधिक्याचा आपल्याला फायदा होईल, आपण विजयी होऊ, ही राजकीय अशा मनात ठेवून भाजप आणि राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माजी आमदार के. पी. पाटील हे देखील महायुतीला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत.

माजी आमदार के. पी. पाटील हे महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) सर्वच पक्षांकडे उमेदवारीची मागणी करत आहेत. राधानगरीची जागा शिवसेना ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता असल्याने के. पी. पाटील शिवसेनेचा रस्ता निवडणार असल्याचं सांगितले जात आहे. पूर्वी मातोश्रीवर शिवसैनिकांनी निनावी पत्र लिहित के पी पाटील यांच्या विरोधात तक्रार केल्या आहेत. उपरा नको, निष्ठावंत शिवसैनिक द्या! अशी मागणी या पत्राद्वारे केली आहे. शिवाय के पी पाटील यांनी शिवसेनेच्या विरोधात काय काय केलं? याचा दाखला त्या पत्रात दिला होता.

माजी आमदार के. पी. पाटील यांनी बिद्री कारखाना (bidri factory), गोकुळ संघ, बाजार समिती निवडणूक मतदारसंघात शिवसैनिकांना के. पी. यांनी कसे डावलले, त्यांच्या बाबतीत काय राजकारण केलं याचा सविस्तर लेखाजोखा शिवसैनिकांनी या पत्रात केला आहे. शिवाय या सर्व निवडणुकीत त्यांचे विरोधक असणारे आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासोबत हात मिळवणी करत काय काय राजकारण केले आहे याची देखील माहिती या पत्रात दिली आहे. त्यामुळे के. पी. पाटील यांना शिवसेनेत (Shivsena) प्रवेश देऊ नये, अशी मागणी या पत्रातून केली आहे.

Kolhapur Politics K P Patil doesn't want to be Patil What exactly is said in 'that' letter
Mahavikas Aghadi : मोठी बातमी! महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची 'मातोश्री'वर तातडीनं बैठक, नेमकं कारण काय?

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी के. पी. यांना दिलेले निमंत्रण ऐकून खूप वाईट वाटल्याचे आहे. अनेक वर्षांपासून शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आम्ही लढतोय, झगडतोय, अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरतोय, गद्दार नेत्यांविरुद्ध संघर्ष करतोय. तर मग आमचा विचार कधी होणार? असा प्रश्नही या पत्राच्या माध्यमातून मातोश्रीला विचारला आहे.

Kolhapur Politics K P Patil doesn't want to be Patil What exactly is said in 'that' letter
Shambhuraj Desai: छत्रपतींचा पुतळा का कोसळला? मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितलं 'हे' कारण

पक्ष आदेशाचा गुलाम बनलोय, असे असताना आमच्या वेदना कोण जाणून घेणार? आम्हाला न्याय कोण देणार? खरंच आमची हात जोडून विनंती आहे की उसने आणि उपरे उमेदवार देऊ नका, अशी सादही पत्रात घातली आहे. हरलो तरी चालेल; पण निष्ठावंताला घेऊन लढूया के. पी. यांनी ‘बिद्री’ कारखान्याच्या निवडणुकीत शिवसेनेला काडीची किंमत दिली नाही. ‘गोकुळ’मध्ये आबिटकर यांच्याशी संगनमत करून शपथा घेऊन एकमेकांचे उमेदवार निवडून आणले. बाजार समितीच्या निवडणुकींमध्येही ते त्यांनी केले. तालुका संघातही त्यांनी शिवसेनेला बाहेर काढले. ‘गोकुळ’, जिल्हा बँकेत स्वतःचा मुलगा, कारखान्यावर स्वतः अध्यक्ष, सतेज पाटील हेच आमचे नेते म्हणणाऱ्या के. पी. यांच्यापासून साधव रहावे, असे या पत्रात नमूद केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com