Kolhapur Election: कोल्हापूर जिल्हा परिषदेचा आराखडा अंतिम,पण आता पुढील प्रक्रियेला न्यायालयाचा आदेश...

Kolhapur ZP News: कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रारूप आराखडे चुकीचे असल्याबाबत सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल झाली होती. त्या अनुषंगाने डिव्हिजनल बेंचचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी हे आदेश दिल्याची माहिती याचिकाकर्ते ॲड. ऋतुराज पवार यांनी दिली.
Kolhapur ZP
Kolhapur ZPSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : जिल्हा परिषद प्रारुप आराखडा गुरुवारी (ता.21) अंतिम मंजूर करताना हरकतींचा विचार न झाल्यामुळे न्यायालयाचा आदेश पुढील प्रक्रियेला लागू राहील, असा आदेश शुक्रवारी (ता.22) कोल्हापूर सर्किट बेंचच्या डिव्हिजनल बेंचने दिला.

कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रारूप आराखडे चुकीचे असल्याबाबत सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल झाली होती. त्या अनुषंगाने डिव्हिजनल बेंचचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी हे आदेश दिल्याची माहिती याचिकाकर्ते ॲड. ऋतुराज पवार यांनी दिली.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रारूप आराखडे तयार करण्यात आले होते. त्यामध्ये ग्रामपंचायतींचे विभाजन केल्यासह अन्य तक्रारी होत्या. याबाबत करवीर तालुक्यातील चौघांनी सर्किट बेंचच्या डिव्हिजनल बेंचकडे याची दाद मागितली होती. त्याची पुढील सुनावणी नऊ सप्टेंबरला होती. मात्र, तरीही आवश्यकता भासल्यास तातडीने न्यायालयात येण्याची मुभा दिली होती.

प्रत्यक्षात जिल्हा परिषद (ZP) पंचायत समितीचा प्रारूप आराखड्याला विभागीय अयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बुधवारी (ता. २०) रोजी अंतिम मान्यता दिली आहे. त्याची प्रसिद्धीही केलेली नाही. त्याचे पत्र कालच जिल्हाधिकारी यांना पाठविले आहे. त्यामुळे प्रारूप आराखड्याला घेतलेल्या हरकतीनुसार संबंधित तक्रारादारांनी ॲड. ऋतुराज पवार यांच्यातर्फें न्यायालयात याची माहिती दिली.

Kolhapur ZP
Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांच्या मुंबईतील आंदोलनाचा धसका; फडणवीस सरकारचा 'हा' सर्वात मोठा निर्णय

प्रारूप आरखड्याला अंतिम मान्यता दिली आहे. हरकतीबाबत कोणतीही विचारणा केली नाही. हा प्रारूप आराखडा चुकीचा आहे, अशी बाजू मांडली. न्यायालयाने आवश्यकता भासल्यास केव्हाही न्यायालयात येण्याची मुभा ठेवली होती. त्यानुसार आज न्यायालयात ही बाजू मांडण्यात आली.

यावर सरकारी वकील सिद्धेश्वर काळेल यांनी तक्रारदारांच्या वतीने घेण्यात आलेल्या हरकतीबाबत म्हणणे मांडण्यासाठी काही कालावधी मिळावा, अशी मागणी केली.

Kolhapur ZP
PMC Election 2025 : देवाभाऊ की अजितदादांचा वरचष्मा? पुणे महानगरपालिकेची बहुचर्चित प्रभाग रचना अखेर जाहीर

दरम्यान, न्यायालयाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पुढ़ील सर्व प्रक्रियेला न्यायालयाचा निकाल लागू राहील, असे आदेश न्यायालयाने दिले. सरकारी वकिलांनी मागितलेल्या मुदतीनुसार मंगळवारी (ता. २६) पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com