Kolhapur ZP : फडणवीसांसोबतच्या प्रवासात फुटली कोल्हापूर ZP अध्यक्षपदाची कोंडी : यड्रावकरांच्या लेकाचे लग्न 'मुश्रीफांना' ठरले लाभदायी

Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या शिल्पा खोत तर उपाध्यक्षपदी भाजपचे तानाजी पाटील यांची निवड झाली आहे.
Chandrakant Patil, Devendra Fadnavis, Hasan Mushrif
Chandrakant Patil, Devendra Fadnavis, Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur ZP : अखेर कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसने खेचून घेतले आहे. सेनापती कापशीच्या जिल्हा परिषद सदस्या शिल्पा खोत यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. तर भाजपला उपाध्यक्षपद मिळाले असून मुडशिंगी जिल्हा परिषद गटाचे सदस्य तानाजी पाटील यांना या पदावर संधी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महासभेत खोत यांच्या निवडीची घोषणा केली.

महायुतीत भाजप आणि राष्ट्रवादीमधील स्पर्धेमुळे मागील महिन्याभरापासून अध्यक्ष निवड रखडली होती. त्यामुळे अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार की भाजपचा होणार? याबाबत कमालीची उत्सुकता लागून राहिली होती. मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री मुश्रीफ यांच्या कोल्हापूरमध्ये बैठका झाल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित मुंबईत बैठका झाल्या. अखेर महिन्याभरापासूनची कोंडी फडणवीस यांच्यासोबतच्या एका प्रवासाने फुटली होती.

कोल्हापूर महानगरपालिकेत ज्या सूत्राप्रमाणे सत्ता स्थापन झाली त्याच सुत्राप्रमाणे जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन व्हावी अशी राष्ट्रवादीची आग्रही मागणी होती. त्याचवेळी मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून गेल्या महिनाभरापासून अध्यक्षपदावर दावे- प्रतिदावे सुरु होते. त्यामुळे अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कोर्टात गेला होता.

Chandrakant Patil, Devendra Fadnavis, Hasan Mushrif
Kolhapur ZP : सांगली, सातारा ZP मध्ये राष्ट्रवादीकडून 'करेक्ट कार्यक्रमाची' तयारी : कोल्हापूरमध्ये शेवटच्या क्षणी सावरला भाजपचा डाव

रविवारी आवाडे-यड्रावकर लग्नसोहळ्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस कोल्हापूरला आले होते. त्यावेळी हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकत्र प्रवास केला. याच प्रवासादरम्यान, चर्चेची कोंडी फुटली आणि फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला अध्यक्ष करण्याला संमती दिली. त्यामुळे मुश्रीफ यांच्यासाठी यड्रावकरांच्या लेकाचे लग्न लाभदायी ठरल्याची चर्चा आहे.

Chandrakant Patil, Devendra Fadnavis, Hasan Mushrif
Satara Politic's : साताऱ्यात मोठा भाऊ व्हायला निघालेल्या भाजपला राष्ट्रवादीने बरोबरीत रोखले; दोन मंत्री, आमदारांची रसदही कुचकामी

रविवारीच जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत पदाधिकारी निवडीबाबत कोल्हापूर विमानतळावर बैठक पार पडली. त्यानुसार नव्या सभागृहातील अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना सव्वा वर्षाचा कालावधी असेल, तर सभापतिपदासाठी एक वर्षाचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार ५ वर्षांत ४ अध्यक्ष, ४ उपाध्यक्ष आणि २० सभापती होणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com