

Kolhapur ZP President : कोल्हापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार सुनील तटकरे आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यातील बैठकीनंतर फडणवीस यांनी मुश्रीफ यांच्या बाजूने कौल दिल्याची माहिती समोर येत आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून एक महिना उलटला तरी महायुतीच्या नेत्यांमधील अध्यक्षपदाचा तिढा अद्याप सुटत नव्हता. जिल्हास्तरावर हा प्रश्न सुटत नसल्याने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील आणि सुनील तटकरे यांना यामध्ये लक्ष घालावे लागले. मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात चेंडू टोलवल्यानंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेवर भाजपचा अध्यक्ष होईल की राष्ट्रवादी काँग्रेसचा होईल? याबाबत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून तर्कवितर्क लढवले जात होते.
कोल्हापूर जिल्हा परिषदेवर सर्वाधिक 20 जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडून आल्या आहेत. महानगरपालिकेतील सुत्रानुसार पहिला अध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेसचा होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्या संदर्भात दावा केला होता. मात्र मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जनसुराज्य शक्तीचे डॉ. विनय कोरे यांना हाताशी धरून जिल्हा परिषदेमध्ये 18 जागा आमच्या असल्याचे सांगत देखील अध्यक्षपदावर दावा केला होता.
तोंडावर गोकुळ दूध संघाची निवडणूक असल्याने जिल्हा परिषदेच्या राजकारणाला देखील तितकेच महत्त्व आले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे वाद गोकुळच्या निवडणुकीत उमटणार हे जवळपास निश्चित झाले होते. मात्र अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महायुतीतील नेत्यांकडून त्याबाबत कोणताच निर्णय घेतला जात नव्हता. अखेर मुंबईत वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो निर्णय देतील. तो मान्य करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अखेर त्याबाबताचा निर्णय झाल्याची माहिती समोर येत असून जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार असल्याचे सांगितले जातं आहे. दरम्यान, उपाध्यक्ष, इतर समितीवरील सभापती पद कोणाला द्यायचे या संदर्भात महायुतीच्या नेत्यामध्ये बैठक होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.