Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांच्या भावजयीच्या अडचणी वाढणार; झेडपीतील विजयाला शिंदेसेनेकडून कोर्टात आव्हान

Sangli Zilla Parishad Election : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावजय माधवी पडळकर यांच्या जिल्हा परिषद सदस्य निवडीला न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यामुळे सांगली जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
Madhvi padalkar-gopichand padalkar
Madhvi padalkar-gopichand padalkarSarkarnama
Published on
Updated on

Sangli, 13 March : भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांची भावजय नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या माधवी ब्रह्मानंद पडळकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण, पडळकर यांच्या जिल्हा परिषद सदस्य निवडीला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे, त्यामुळे सांगलीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आता पडळकर गटाकडून न्यायालयात काय उत्तर दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

आटपाडी तालुक्यातील निंबवडे जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांच्या पत्नी माधवी पडळकर यांनी सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीतील माधवी पडळकर यांच्या विजयाला विटा न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

माधवी पडळकर यांच्या विरोधात निवडणूक लढवलेल्या शिंदेसेनेच्या (Shinde Sena) पराभूत उमेदवार विद्या मोटे यांनी गुरुवारी (ता. १२ मार्च) विटा न्यायालयात याचिका दाखल केली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड घडल्याने भाजपची डोकेदुखी वाढणार आहे.

आटपाडी तालुक्यातील निंबवडे गटात शिवसेनेच्या विद्या मोटे यांनी भाजपच्या माधवी पडळकर यांना आव्हान दिले होते. चुरशीच्या लढतीत भाजपच्या माधवी पडळकर यांनी ९८० मतांनी शिंदेसेनेच्या मोटे यांच्यावर विजय मिळविला होता. हा विजय लोकशाही मार्गाने मिळविलेला नाही. हुकूमशाही, दमदाटी आणि दहशत माजवून माधवी पडळकर यांनी विजय मिळविला आहे, असा आरोप शिवसेनेच्या पराभूत उमेदवार विद्या मोटे यांनी केला आहे.

Madhvi padalkar-gopichand padalkar
Sangola Politic's : शेकापची 50 वर्षांची सत्ता संपुष्टात; सांगोल्यात भाजपचा सभापती, दीपक साळुंखेंची ऐनवेळी पलटी

शिवसेनेच्या पराभूत उमेदवार विद्या मोटे यांनी गुरुवारी (ता. १२ मार्च) विटा न्यायालयात माधवी पडळकर आणि राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. त्याबाबतची माहिती मोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.

Madhvi padalkar-gopichand padalkar
Mohite Patil VS BJP : मोहिते पाटलांची मोठी खेळी : दोन सदस्यांच्या शिंदेसेनेला सभापतिपद, पालकमंत्र्यांना शह देण्याचा डाव

निवडणुकीच्या प्रक्रियेवेळच्या सर्व घटनांचे पुरावे आमच्याकडे आहेत. निंबवडे गटाची निवडणूक ही लोकशाही मार्गाने झालीच नाही. निवडणुकीच्या वेळी विरोधकांकडून दहशत निर्माण करण्यात आली होती. प्रचाराच्या गाड्याही फोडण्यात आल्या होत्या, काही मतदारांच्या डोक्याला बंदूक लावून मारहाणही करण्यात आली होती, त्यामुळे ही निवडणूक लोकशाही मार्गाने झाली नाही, असा दावा पराभूम उमेदवार विद्या मोटे यांनी पत्रकार परिषदेत केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com