Kolhapur ZP Result : कोल्हापूरमध्ये काँग्रेसला मोठा झटका; जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता!

Mahayuti in Power Kolhapur ZP : महायुतीने आतापर्यंत 34 जागा जिंकल्या आहेत. तर, महाविकास आघाडीने 16 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे महायुमधील पक्ष एकत्र येत सत्ता स्थापन करतील असे चित्र कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये आहे.
Kolhapur ZP Result 2026
Kolhapur ZP Result 2026Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Local Body Election 2026: कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निकालात मोठे फेरबदल झाले आहेत. सुरुवातीला आघाडीवर असणारी मागे पडली असून काँग्रेस 16 जागांवर विजयी होताना दिसत आहे.

तर, महायुतीमधील स्वतंत्र लढलेले पक्षांची एकत्रीत संख्या 34 पार झालेली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीतील आतापर्यंत 68 पैकी 50 जागांचे कल हाती आले आहेत. त्यानुसार महायुतीमधील पक्ष एकत्र येत सहज सत्ता स्थापन करतील, असे चित्र आहे.

महायुतीने आतापर्यंत 34 जागा जिंकल्या आहेत. तर, महाविकास आघाडीने 16 जागांवर विजय मिळवला आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी 10 जागांवर विजय झाले आहेत. तर, जनसुराज्य शक्तीचा 4 जागांवर विजय झाला आहे.

काँग्रेसने 13 जागांवर विजयी झाले आहे. तर, ठाकरेंच्या शिवसेनेला अवघ्या 2 जागांवर विजय मिळवता आला आहे. अजून 18 जागांचा निकाल बाकी आहे. मात्र, या महायुतीमधील पक्ष एकत्र येत सहज सत्ता स्थापन करतील, असे चित्र आहे.

Kolhapur ZP Result 2026
Pune Mayor News : मंजुषा नागपुरेंनी हाती घेतला पुण्याचा 'कारभार', जोडीला आठवलेंचा शिलेदार

विजयी उमेदवार यादी

घुणकी जिल्हा परिषद - शुभांगी कुंभार (काँग्रेस)

नवे पारगाव गण - भारत वीरधवल पाटील (काँग्रेस)

घुणकी पंचायत समिती गण - संगिता संग्राम पाटील (काँग्रेस)

नूल जिल्हा परिषद गट - अनिरुद्ध रेडेकर (जनसुराज्य)

उत्तूर पंचायत समिती गण - विकास चोथे (राष्ट्रवादी)

जिल्हा परिषद गट आघाडीवर - शिरीष देसाई (राष्ट्रवादी)

माले पंचायत समिती गण - भारती पाटील (राष्ट्रवादी)

सातवे जिल्हा परिषद गट - जयंत पाटील (राष्ट्रवादी)

सातवे पंचायत समिती गण - माणिक पाटील (राष्ट्रवादी)

Kolhapur ZP Result 2026
Dharashiv ZP election results : तेर गटातील चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादीची मुलुख मैदानी तोफ पराभूत; थेट तिसऱ्या क्रमांकावर; अर्चना पाटील यांचा दणदणीत विजय

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com