Dharashiv ZP election results : तेर गटातील चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादीची मुलुख मैदानी तोफ पराभूत; थेट तिसऱ्या क्रमांकावर; अर्चना पाटील यांचा दणदणीत विजय

Dharashiv ZP election News : : धाराशिव जिल्हयातील मतमोजणीला सोमवारी सकाळी सुरुवात झाली. याठिकाणी धाराशिव तालुक्यातील तेर गटात चुरशीची लढत झाली.
BJP leader Archana Patil and NCP Sharad Pawar faction candidate Sakshana Salgar prepare for a direct electoral battle in the Ter group of Dharashiv Zilla Parishad elections.
BJP leader Archana Patil and NCP Sharad Pawar faction candidate Sakshana Salgar prepare for a direct electoral battle in the Ter group of Dharashiv Zilla Parishad elections.Sarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : धाराशिव जिल्हयातील मतमोजणीला सोमवारी सकाळी सुरुवात झाली. याठिकाणी धाराशिव तालुक्यातील तेर गटात चुरशीची लढत झाली. याठिकाणी भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या 2360 मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार किर्तीमाला खटावकर यांचा पराभव केला. याठिकाणी तिरंगी झालेल्या तिरंगी लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार सक्षणा सलगर या तिसऱ्या स्थानावर राहिल्या आहेत.

धाराशिव जिल्ह्यातील 55 जिल्हा परिषदेच्या गटासाठी 110 पंचायत समितीच्या गणासाठी शनिवारी मतदान पार पडले. त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते. सॊमवारी सकाळी मतमोजणी सुरु झाली असून त्यामध्ये अनेक धक्कादायक निकाल समोर येत आहेत.

BJP leader Archana Patil and NCP Sharad Pawar faction candidate Sakshana Salgar prepare for a direct electoral battle in the Ter group of Dharashiv Zilla Parishad elections.
BJP Punjab strategy : पंजाबमध्ये काँग्रेसला खिंडार? बडा नेता पुन्हा भाजपच्या 'पिच'वर उतरणार? पत्नीच्या विधानांनी राजकारण तापले!

धाराशिव तालुक्यातील तेर गटात चुरशीच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याठिकाणी भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या विजयी झाल्या. भाजपच्या उमेदवार अर्चना पाटील या दोन 360 मतांनी विजयी झाल्या आहेत. पाटील यांना 7 हजार 597 मते मिळाली तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार कीर्तिमाला खटावकर यांना 5 हजार 237 मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार सक्षणा सलगर यांना 1 हजार 253 मते मिळाली.

BJP leader Archana Patil and NCP Sharad Pawar faction candidate Sakshana Salgar prepare for a direct electoral battle in the Ter group of Dharashiv Zilla Parishad elections.
Shivsena Politics : "आमच्याकडे 237 आमदार, उगाचच धाडस..." उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाण्याच्या चर्चा सुरू असतानाच शिंदेंच्या शिलेदाराने डिवचलं

विशेष म्हणजे यापूर्वी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणूक रिंगणात उतरलेल्या अर्चना पाटील पराभूत झाल्या होत्या. मात्र तेर गटातील या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यामध्ये अर्चना पाटील यांनी बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार सक्षणा सलगर या तिसऱ्या स्थानावर राहिल्या आहेत.

BJP leader Archana Patil and NCP Sharad Pawar faction candidate Sakshana Salgar prepare for a direct electoral battle in the Ter group of Dharashiv Zilla Parishad elections.
Sunil Shelke NCP : भाजपच्या सत्तेला अजितदादांचा शिलेदार लावणार सुरुंग! जिल्हा परिषद निवडणुकीत इतिहास बदलणार?

दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील या निवडणुकीत जिल्ह्याची सत्ता काबीज करण्यासाठी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळाला.

BJP leader Archana Patil and NCP Sharad Pawar faction candidate Sakshana Salgar prepare for a direct electoral battle in the Ter group of Dharashiv Zilla Parishad elections.
Congress Alert : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा, काँग्रेसने उचललं मोठं पाऊल; कार्यकर्त्यांना स्पष्ट सांगितले,...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com