koregaon : शशिकांत शिंदे चिंतनात व्यस्त; महेश शिंदेंचा राष्ट्रवादीला 'दे धक्का'

मुख्यमंत्री शिंदे Eknath Shinde व आमदार शिंदे Mahesh Shinde यांनी डॉ. तावरे Dr. AbhayTaware , सुनील भोसले Sunil Bhosale यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हातात भगवा झेंडा देवून स्वागत करण्यात आले.
Eknath Shinde, Mahesh Shinde
Eknath Shinde, Mahesh Shindesarkarnama
Published on
Updated on

कोरेगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील आपले संघटन बळकट करण्यासाठी एकीकडे शिर्डीत चिंतन शिबिरात व्यस्त असताना कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला "दे धक्का" दिला आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या वाठार स्टेशन गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सदस्य डॉ. अभय तावरे यांनी आज प्रमुख कार्यकर्त्यांसह मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

मुख्यमंत्री शिंदे व आमदार शिंदे यांनी डॉ. तावरे, सुनील भोसले यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हातात भगवा झेंडा देवून स्वागत करण्यात आले. कोरेगाव मतदारसंघात आमदार शिंदे यांच्या कामाची पद्धत पाहून आणि सर्वसामान्यांचा विकास करण्याची त्यांची हातोटी लक्षात घेऊन बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

भविष्यकाळात कोरेगाव विधानसभा मतदारसंघात व जिल्हा परिषदेच्या गटामधे बाळासाहेबांच्या शिवसेनेची ताकद वाढविणार असून, मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारची ध्येयधोरणे आणि विचारधारा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोचविणार असल्याची ग्वाही डॉ. तावरे यांनी यावेळी दिली.

Eknath Shinde, Mahesh Shinde
Satara : मी नव्हे उदयनराजेंनी फोन कट केला... शंभूराज देसाईंचे स्पष्टीकरण

बाळासाहेबांच्या शिवसेने प्रवेश करणाऱ्यांमध्ये भाडळी खोऱ्यातील ज्येष्ठ नेते विजयराव घोरपडे, पंचायत समितीचे माजी सदस्य विलास पवार व राजूआप्पा घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोलवडी (ता. कोरेगाव) विकास सोसायटीचे अध्यक्ष भानुदास भोसले, किन्हई येथील ज्येष्ठ नेते सुनील भोसले, भाडळ्याचे माजी सरपंच धनंजय तारळकर, किरण घोरपडे, रामभाऊ निकम, अरविंद तारळकर, महेश चव्हाण, निलेश जाधव यांचा समावेश आहे.

Eknath Shinde, Mahesh Shinde
NCP : राष्ट्रवादीला खोक्याचीच भाषा कळते; भांडवलदार, ठेकेदारांशीच त्यांचे संबंध... महेश शिंदे

तसेच त्यांच्यासाोबत सचिन जाधव, वैभव भोसले, राजेंद्र वायदंडे, आकाश खाडे, अमोल भोसले, दिलीप भोसले, सचिन भोसले, संजय भोसले, शरदभाऊ भोसले, सुनीलराव घोरपडे, हनुमंतराव जाधव, अविनाश यशवंत मोहिते, राजू साळुंखे, सचिन फणसे, चंदूकाका पवार, अनिल अवचिते, रमेश कलाटे, शांताराम चाटे, आदित्य तावरे, सुनील धुमाळ यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

Eknath Shinde, Mahesh Shinde
Satara : ४८ तासांचे सरकार केलं, ती बेईमानी नव्हती का... शंभूराज देसाई अजितदादांवर बरसले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com