Satara : मी नव्हे उदयनराजेंनी फोन कट केला... शंभूराज देसाईंचे स्पष्टीकरण

आमदार MLA शिवेंद्रसिंहराजे भोसले Shivendraraje Bhosale हे माझी वेळ घेऊन निवासस्थानी आले होते. त्याच काळात उदयनराजे यांचे कार्यकर्ते सुनील काटकर Sunil Katkar यांनी उदयनराजेंना Udayanraje Bhosale फोन लावून दिला.
Shambhuraje Desai, Udayanraje Bhosale
Shambhuraje Desai, Udayanraje Bhosalesarkarnama
Published on
Updated on

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी फोन सुरू असतानाच आमच्या निवासस्थानी आमदार शिवेंद्रसिंहराजे दाखल झाले. मी त्यांचे स्वागत केले आणि उदयनराजेंना म्हटलं, एका बाजूला थोरल्या राजांचा फोन सुरू आहे आणि धाकटे राजे मला भेटायला आले आहेत, असे मी म्हटलं तेवढ्यात तिकडून फोन कट झाला. मी नव्हे तर उदयनराजेंनी फोन कट केला असे स्पष्टीकरण पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहे.

राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यावर पत्रकारांशी संवाद साधला. काल खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक पालकमंत्र्यांकडे मजूर फेडरेशनच्या निवडणुकीच्यानिमित्ताने आले होते.

त्यावेळी उदयनराजेंशी पालकमंत्री फोनवरून बोलत होते. त्याच वेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले तेथे आल्याने फोन कट झाला. हा फोन कोणी कट केला, याविषयी शंभूराज देसाईंना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, शुक्रवारी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे माझी वेळ घेऊन निवासस्थानी आले. त्याच काळात राजे येण्यापूर्वी उदयनराजे यांचे कार्यकर्ते सुनील काटकर यांनी उदयनराजेंना फोन लावून दिला.

Shambhuraje Desai, Udayanraje Bhosale
सातारा पालिकेत ५० जागा जिंकणार; मिशीला पीळ, ताव मारून होत नसतं... उदयनराजे

माझं बोलणं सुरू होतं. त्याच वेळी मी शिवेंद्रसिंहराजे तेथे आले त्यामुळे मी त्यांचे स्वागत केले आणि उदयनराजेंना म्हटलं एका बाजूला थोरल्या राजांचा फोन सुरू आहे. धाकटे राजे मला भेटायला आले आहेत, असे मी म्हटलं तेवढ्यात तिकडून फोन कट झाला. मी फोन कट केला नाही, असेही देसाईंनी नमुद केले.

Shambhuraje Desai, Udayanraje Bhosale
Satara : शिवाजी महाराजांचे स्मारक सातारा पालिकेकडे हस्तांतरीत करा... शिवेंद्रसिंहराजे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com