Nilesh Ghaiwal : गुंड निलेश घायवळने इंग्लंडमध्ये उभं केलं स्वतंःच साम्राज्य : अलिशान घर, मुलाचं हायफाय शाळेत ॲडमिशन

Pune gangster Nilesh Ghaiwal foreign empire : कोथरुड येथील गोळीबार आणि हल्ला प्रकरणात कुख्यात गुंड निलेश घायवळ याचे नाव समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून तो आता फरार झाल्याचे उघड झाले आहे.
Nilesh Ghaiwal Pune
Nilesh Ghaiwal PuneSarkarnama
Published on
Updated on
  1. कोथरुड गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणातील तपासात निलेश घायवळचे लंडनमध्ये आलिशान घर व साम्राज्य असल्याचे समोर आले.

  2. त्याचा मुलगा हायफाय शाळेत शिकत असल्याचेही तपासात उघड झाले आहे.

  3. पुण्यातील कुख्यात गुंडाचा परदेशी कनेक्शन व कुटुंबाची शाही जीवनशैलीमुळे खळबळ उडाली आहे.

Pune News : पुण्यात काही दिवसांपूर्वीच कोथरुड परिसरात गोळीबार आणि कोयता हल्ल्यात दोघांना जखमी करण्यात आले होते. या प्रकरणात पोलिसांनी तपास करत 6 जणांच्या मुसक्या आवळल्या होत्या. तर अधिक तपासात कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि त्याच्या टोळीचा हात असल्याचे समोर आले होते. आता पोलिस घायवळचा शोध घेत असून तो पोलिसांच्या हातावर तुरी देत थेट परदेशात पळाल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीत घायवळबाबत धक्कादायक माहिती समोर आली असून तो लंडनला पळून गेला आहे. त्याचे तेथे स्वतंःच साम्राज्य असून अलिशान घर आहे. तसेच दुसऱ्यांच्या मुलांना वाम मार्गी लावणाऱ्या घायवळच्या मुलाचं ॲडमिशन मात्र हायफाय शाळेत असल्याचे समोर आले आहे.

पुण्यातील कोथरुड गोळीबार प्रकरणात पोलिसांनी कारवाईचा धडका सुरु केला आहे. घायवळसह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर घायवळ टोळीवर मकोका कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई देखील करण्यात आली आहे. पोलिसांनी कोथरुड परिसरात गोळीबार आणि कोयता हल्ल्याप्रकरणात कारवाईचा बडगा उगारताच घायवळने पळ काढला आहे.

त्याचा शोध पोलिस घेत असून त्याच्यावर 15 ते 20 असे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे. तसेच त्याच्या मालकीच्या तीन दुचाकी आणि एक स्कॉर्पिओही जप्त करण्यात आल्या आहेत. एकीकडे पुण्यातील त्याच्या संपत्तीचा शोध पुणे पोलिस घेत असतानाच त्याचे लंडनमधील साम्राज्य समोर आले आहे.

Nilesh Ghaiwal Pune
Gangster Nilesh Ghaiwal: कुख्यात गुंड निलेश घायवळला पासपोर्ट मिळवून देणारा 'आका' कोण ? नगर अन् पुण्यावर संशयाची सुई

खंडणी, अपहरण, खून आणि दहशत अशा गुन्ह्यातून त्याने मिळवलेल्या काळ्या पैशाने लंडणमध्ये मोठी संपत्ती जमवली आहे. तेथे त्याचे आलिशान घर असून कुटुंबही तेथेच आहे. त्याने त्याच्या मुलाला ‘हाय-फाय’ शाळेत दाखल केल्याची माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली आहे.

पण घायवळ यांच्यावर 2001 पासून गंभीर गुन्हे दाखल असतानाही त्याला पासपोर्ट कसा मिळाला? त्याला त्यासाठी कोणी मदत केली याचीही आता माहिती समोर आली आहे. पुण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असतानाही घायवळ याने बनावट पत्ता वापरून पासपोर्ट मिळवले होते. त्याने अहिल्यानगर पोलिसांकडे अर्ज करत पासपोर्ट मिळवला होता. यासाठी येथील कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गौरी घुमटानंदी बाजार, कोतवाली, माळीवाडा रोड या बनावट पत्त्याचा वापर केला होता. त्यामुळे आता नगर पोलीस वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. घायवळ याच्या पासपोर्टसाठी अहिल्यानगर पोलिसांनी संमती दिलीच कशी असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

दरम्यान आता तोत परदेशात पळून गेला असून त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. तो भारतात परतताच त्याला अटक होईल. तर आता पोलिस त्याला भारतात आणण्यासाठी पुढील कारवाई काय करतात याकडे राज्याचे लक्ष आहे.

नेमकं प्रकरण काय?

पोलिसांच्या माहितीनुसार 17 सप्टेंबर रोजी कोथरूड पोलिस ठाण्यापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर या घटना घडल्या. मयूर गुलाब कुंबरे, मयंक विजय व्यास, गणेश सतीश राऊत, दिनेश राम फाटक आणि आनंद अनिल चादळेकर या आरोपींनी रस्ता न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून आकाश धुमाळ यांच्याशी वाद घातला. तसेच थेट 36 वर्षीय धुमाळवर मयूर कुंबरे यांने गोळीबार केला. ज्यात त्याचा मांडीला गोळी लागल्याने तो जखमी झाला. तसेच दुसऱ्या एका तरुणावर कोयत्याने वार करून त्यालाही गंभीर जखमी केले होते. याच प्रकरणाच्या चौकशीत घायवळ टोळीचा थेट सहभाग समोर आले होते. यानंतर घायवळसह दहाजणांवर मोक्का कारवाई करण्यात आली असून 5 जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. मयुर कुंबरे, मयंक व्यास, गणेश राऊत, दिनेश फाटक, आनंद चांदेलकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून बाकीचे आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

Nilesh Ghaiwal Pune
Nilesh Ghaiwal News : पुणे पोलिसांचा दरारा, इभ्रत मातीत मिळवून गुंड निलेश घायवळ पळाला... राजकीय पॉवर ठरली भारी?

FAQs :

प्र.१: निलेश घायवळ कोण आहे?
उ: तो पुण्यातील कुख्यात गुंड असून अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याचे नाव आहे.

प्र.२: कोणत्या प्रकरणात त्याचा तपास सुरू आहे?
उ: कोथरुड परिसरातील गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणात.

प्र.३: तपासात काय नवीन उघड झाले आहे?
उ: त्याचे लंडनमध्ये आलिशान घर व साम्राज्य आहे, तसेच मुलगा हायफाय शाळेत शिकतो.

प्र.४: ही माहिती समोर आल्यानंतर काय प्रतिक्रिया उमटली?
उ: पुणे व महाराष्ट्रात गुन्हेगारी आणि अंडरवर्ल्ड कनेक्शनवर खळबळ उडाली.

प्र.५: पुढील तपास कोणत्या दिशेने होणार आहे?
उ: परदेशातील मालमत्ता, आर्थिक स्रोत व कुटुंबाच्या जीवनशैलीची चौकशी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com