Gangster Nilesh Ghaywal
Gangster Nilesh Ghaywalsarkarnama

Gangster Nilesh Ghaiwal: कुख्यात गुंड निलेश घायवळला पासपोर्ट मिळवून देणारा 'आका' कोण ? नगर अन् पुण्यावर संशयाची सुई

Nilesh Ghaiwal Crime News: पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळवर खून, खुनाचा प्रयत्नासह दोन डझनांहून अधिक गुन्हे दाखल असतानाही तो लंडनला पळाला असल्याचं समोर आला आहे. मात्र गेल्या वीस वर्षांपासून गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या घायवळला पासपोर्ट मिळालाच कसा? हा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.
Published on

Pune News : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळवर खून, खुनाचा प्रयत्नासह दोन डझनांहून अधिक गुन्हे दाखल असतानाही तो लंडनला पळाला असल्याचं समोर आला आहे. मात्र गेल्या वीस वर्षांपासून गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या घायवळला पासपोर्ट मिळालाच कसा? हा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

तसेच निलेश घायवळ (Nilesh Ghaiwal) याने हा पासपोर्ट पुणे अथवा नगर मधून काढला असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे निलेश घायवळला पासपोर्ट मिळवून देण्यासाठी मदत करणारे राजकीय आणि प्रशासकीय आक्का नेमके कोण आहेत का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

घायवळचा गुन्हेगारीचा इतिहास

निलेश बन्सिलाल घायवळ (वय 45), मूळतः सोनेगाव (अहमदनगर) येथील रहिवासी असलेला हा गुंड, पुण्याच्या कोथरुड परिसरात गेल्या 20 वर्षांपासून दहशत माजवत आहे. त्याने सुरुवातीला गजानन मारणे (गजा मारणे) याच्या टोळीसोबत काम केले, पण नंतर स्वतंत्र टोळी उभी करून पुण्यातील गुंडाराज चालवू लागला.

पोलिस (Police) रेकॉर्डनुसार, त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, वसुली, बेकायदा शस्त्रसाठा आणि मारामारीसह 12 ते 24 गुन्हे दाखल आहेत. ते 2009 या काळात त्याने मारणे टोळीशी वैमनस्य वाढवले, ज्यामुळे पुण्यात अनेक गँगवॉर झाले. 2029 मध्ये जामीन मिळाल्यानंतर तो तुरुंगाबाहेर आला, पण 2023 पर्यंत विविध गुन्ह्यांमुळे पुन्हा अडकला. त्याच्या टोळीने कोथरुडमधील शेकडो गुंडांना सांभाळले असून, परिसरात दहशत कायम ठेवण्यासाठी दरवर्षी नवीन गुन्हे घडवले जातात.

Gangster Nilesh Ghaywal
Congress Election Strategy: सतेज पाटील अन् प्रणिती शिंदेंनी सांगितला स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जिंकण्याचा 'हा' फॉर्म्युला

मागील आठवड्यात कोथरुड येथे घायवळच्या टोळीतील गुंडांनी रस्त्यावरील किरकोळ वादातून एका खासगी कर्मचाऱ्यावर (29 वर्षे) गोळीबार केला. यात तो जखमी झाला, तर एका १६ वर्षीय तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. या घटनेच्या तपासात घायवळचा मास्टरमाइंड असल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याच्यासह आठ साथीदारांवर महाराष्ट्र नियंत्रण संघटित गुन्हे कायदा (मकोका) लावला आहे.

तपासादरम्यान घायवळने आपल्या गुंडांना "टोळीची दहशत कमी होतेय, ती वाढवा" असे आदेश दिल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी 26 सप्टेंबर रोजी घायवळविरुद्ध 'लूक आऊट सर्क्युलर' (एलओसी) जारी केले. त्यापूर्वीच घायवळ लंडनला गेला असल्याचा समोर आला आहे.लंडनला येथे त्यानं आलिशान घर बांधले आहे. त्याचा मुलगा स्थानिक हायफाय शाळेत शिकत असल्याचेही बोललं जात आहे.

Gangster Nilesh Ghaywal
Medha Kulkarni Garba Issue: नागरिकांचे फोन मेसेज आले अन मेधा कुलकर्णी प्रचंड संतापल्या, मग थेट जाऊन गरबाच बंद पाडला

घायवळवर बॉम्बे हायकोर्टाने पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले होते. तरी तो कसा परदेशात गेला, याची चौकशी सुरू आहे. पासपोर्ट कसा मिळवला आणि व्हिसा कसा मिळाला, हे पोलिसांच्या तपासाचे केंद्रबिंदू आहेत.

मात्र, सामान्य माणसाला पासपोर्ट काढायचा तर पोलीस वेरिफिकेशन सारख्या गोष्टीं दरम्यान मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागतो. काही किरकोळ गोष्टींवरून अनेक यांचे पासपोर्ट नाकारले ही जातात मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात गंभीर गुन्हे दाखल असताना घायवळला पासपोर्ट मिळालाच कसा ? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Gangster Nilesh Ghaywal
Vijay Rally Stampade: अभिनेता अन् राजकारणी थलापती विजयच्या रॅलीला तुफान गर्दी! चेंगराचेंगरीत ३३ जणांचा मृत्यू

निलेश गायवळ याचे राजकीय संबंध लपलेले नाहीत अनेकदा तो अनेक राजकीय नेत्यांसोबत पाहिला देखील मिळाला आहे. याबाबत राजकीय नेते मंडळी कडून टीका देखील करण्यात आली आहे. त्यामुळे निलेश घायवळ याला पासपोर्ट मिळवून देण्यासाठी कोणत्या राजकीय नेत्यांनी अथवा कोणत्या प्रशासकीय अधिकाऱ्याने मदत तर केली नाही ना ? अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.

तसेच हा पासपोर्ट नेमका पुण्यातुन निघाला की, नगरमधून याबाबत देखील माहिती पोलिसांकडून दिली जात नाहीये. त्यामुळे या पासपोर्ट प्रकरणाचा गूढ आणखी गडद झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com