Satara Politic's : कुणबी दाखला वसंतराव मानकुमरेंना पुन्हा पाठविणार झेडपीत; शिवेंद्रराजे अन्‌ शशिकांत शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष

Vasantrao Mankumare News : जावळी तालुक्यातील म्हसवे गटात मागास प्रवर्गाचे आरक्षण पडल्याने राजकीय समीकरणे ढवळली असून, कुणबी दाखल्याचा आधार घेण्याच्या प्रयत्नामुळे इच्छुकांमध्ये गोंधळ आणि तणाव निर्माण झाला आहे.
Vasantrao Mankumare
Vasantrao MankumareSarkarnama
Published on
Updated on
  1. जावळी तालुक्यातील म्हसवे गटासाठी ओबीसी आरक्षण लागू झाल्याने प्रस्थापित नेत्यांची अडचण वाढली असून, अनेकांनी कुणबी दाखला दाखल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

  2. या गटात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आमदार शशिकांत शिंदे यांची ताकद जवळपास समान असल्याने, योग्य उमेदवाराची निवडच विजय ठरवेल.

  3. माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांच्याकडे कुणबी दाखला असल्याने त्यांची शक्यता कायम आहे, पण ओबीसी कार्यकर्त्यांमध्ये असंतोष असून नवख्या उमेदवाराला संधी मिळू शकते.

भाऊसाहेब जंगम

Satara, 18 Octobetr : राजकीयदृष्ट्या संवेदनशील जावळी तालुक्यातील म्हसवे गटासाठी नागरिकांच्‍या मागास प्रवर्गाचे आरक्षण पडले आणि प्रस्‍थापितांची कोंडी झाल्‍याचे चित्र निर्माण झाले. पण अनेकांनी कुणबी दाखल्‍याचा आधार घेण्याचा प्रयत्न सुरू केल्याने इतर मागास प्रवर्गातील इच्छुकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. येथील गटावर मंत्री शिवेंद्रसिंहराजेंची मजबूत पकड असली तरी राष्‍ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्‍यक्ष, आमदार शशिकांत शिंदेंचीही ताकदही येथे तितकीच महत्त्वपूर्ण असल्याने त्यांची रणनीती दुर्लक्षून चालणार नाही. त्‍यामुळे योग्य उमेदवारांच्या निवडीवरच येथील विजयाची गणिते अवलंबून राहतील.

आमदार शशिकांत शिंदे यांचे हुमगाव आणि सातारा (Satara) जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांचे कावडी हे गावही या गटात येत असल्याने या गटात आमदार शिंदे व मंत्री शिवेंद्रसिंहराजे कोणाच्‍या डोक्यावर हात ठेवणार? याची उत्सुकता लागून राहिली आहे. आजवर एक अपवाद वगळता या गटाने कायमच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली आहे.

वसंतराव मानकुमरे (Vasantrao Mankumare) यांनी दोनवेळा म्हसवे गटाचे प्रतिनिधित्व केले असून, एकदा बिनविरोध, तर एकदा मोठ्या मताधिक्याने ते इथून निवडून आले आहेत. यावेळीही त्यांनी या गटातून लढण्याची जोरदार तयारी केली होती. मात्र, आरक्षणाने मानकुमरेंची कोंडी केली आहे. पण मानकुमरे यांच्याकडे कुणबी दाखला असल्याने तेच इथून लढतील, असे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत. मानकुमरेंच्या उमेदवारीबाबत ओबीसीत नाराजी असून, ओबीसीतील सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Vasantrao Mankumare
Umesh Patil : उमेश पाटलांचा राजन पाटलांना इशारा; ‘अनगरमध्ये माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न; पण लक्षात ठेवा तुम्हालाही नरखेड, मोहोळमध्ये यायचंय’

नवख्या चेहऱ्याला संधी?

आमदार शशिकांत शिंदेंना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात असला तरी त्यांच्यापुढेही उमेदवार निवडीचे आव्हान असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्‍या येथील गटाकडून याठिकाणी कडव्या लढतीची अपेक्षा असल्याने आमदार शिंदे हे नवख्या चेहऱ्याला संधी देतील, असा अंदाज आहे.

दरम्यान, वसंतराव मानकुमरे यांनी ऐनवेळी शशिकांत शिंदे यांची भेट घेतल्याने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या राजकीय खेळीकडे जावळीचे लक्ष असणार आहे. कारण उमेदवाराचा निवड हाच येथील विजयाचा गेम पाईंट ठरण्याची शक्यता आहे, त्यामुळे म्हसवे गटातून कोण निवडणूक लढविणार याकडे जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.

Vasantrao Mankumare
Panchgani : थंड हवेच्या पाचगणीचा इतिहास अपक्षांच्या बाजूने; पण यंदा मंत्री मकरंद पाटलांना लक्ष्मी कऱ्हाडकर वरचढ ठरणार?

Q1: म्हसवे गटात कोणते आरक्षण लागू झाले आहे?
A1: या गटासाठी नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे (ओबीसी) आरक्षण लागू झाले आहे.

Q2: आरक्षणामुळे कोणत्या नेत्यांची अडचण वाढली आहे?
A2: वसंतराव मानकुमरे यांच्यासह काही प्रस्थापित नेते पात्रतेच्या निकषांमुळे अडचणीत आले आहेत.

Q3: या गटात प्रमुख राजकीय ताकद कोणाची आहे?
A3: मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आमदार शशिकांत शिंदे यांची येथे समान राजकीय पकड आहे.

Q4: निवडणुकीत विजयाचे समीकरण कशावर अवलंबून आहे?
A4: योग्य आणि स्वीकारार्ह उमेदवाराच्या निवडीवरच विजयाची शक्यता अवलंबून आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com