Ladki Bahin Yojana Impact : ‘लाडकी बहीण’ कोल्हापूरच्या ठेकेदारांवर कोपली! महायुती सरकारने थकवले 650 कोटी...

Kolhapur developmental Works Contractors protest news : महिनाभरात बिल न मिळाल्यास 1 मार्चपासून काम बंद आंदोलन करण्याचा निर्धार ठेकेदारांनी घेतला आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : राज्यात माहिती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केल्यानंतर विरोधकांनी राज्यातील तिजोरीत खडखडाट होईल, असा दावा केला होता. हा दावा आता काही प्रमाणात सत्य असल्याचे सिद्ध होत आहे. राज्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या 2 कोटी 48 लाख इतकी आहे. त्यामुळे तिजोरीवर हजारो कोटींचा भार पडत आहे. त्याचा फटका आता विकासकामांना बसण्याची भीती आहे.

कोल्हापूरच्या ठेकेदारांनाचे कोट्यवधी रुपये थकल्याने त्यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. गेली 5 महिने शासकीय विकासकामे केलेल्या कंत्राटदारांचा 650 कोटींचा निधी राज्य सरकारकडे थकला असून यामुळे नवीन कामंही रेंगाळली आहेत. या महिनाभरात बिल न मिळाल्यास 1 मार्चपासून काम बंद आंदोलन करण्याचा निर्धार ठेकेदारांनी घेतला आहे.

Devendra Fadnavis
CM Ladki Bahin Yojana : 'आता 'लाडक्या बहि‍णीं'साठी लढणार, पैसे कसे बंद करतात तेच पाहतो'; जयंत पाटील कडाडले

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे चार दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील ठेकेदारांनी निवेदन देऊन झालेल्या कामांची बिले मंजूर करून द्यावीत, अशी मागणी केली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 110 शासकीय कामांच्या ठेकेदारांची बिल गेली 5 महिने प्रलंबित आहेत. सर्वाधिक सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रलंबित आहेत.

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात लागू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सर्वाधिक खर्च होत आहे. शिवाय विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार आल्यानंतर ही योजना सुरू आहे. अशातच महायुती सरकारमधील काही मंत्र्यांनी एकवेळ विकासकामांना कात्री लावू पण लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार नाहीत, असा दावा छातीठोकपणे केला आहे. मात्र त्याचा परिणाम आता विकासावर होत आहे.

Devendra Fadnavis
Congress Politics: ६ टर्म नगरसेविका राहिलेल्या डॉ. हेमलता पाटील काँग्रेस सोडताना झाल्या भावूक, म्हणाल्या, ‘काँग्रेसचे राज्य नेतृत्व आंधळे’

नुकतेच महाराष्ट्र राज्य कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे राज्य अधिवेशन यवतमाळ येथे पार पडले. या अधिवेशनात बिलं थकल्यामुळे हे आंदोलन टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती कोल्हापूर जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष रमेश भोजकर यांनी दिली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील जवळपास ठेकेदारांची सहाशे पन्नास कोटी रुपये थकीत आहेत.

ठेकेदारांची धावपळ

आर्थिक वर्ष संपण्यासाठी दीड महिन्यांचा अवधी असला तरी व्यवसायाचा ताळेबंद करताना गुंतवणूक आणि जमाखर्च मांडताना कंत्राटदारांची धावपळ उडणार आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार धास्तावला आहे. सध्या राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे कंत्राटदारांना नाहक त्रास करावा लागणार आहे. त्यामुळे महिनाभराच्या आत प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती राज्य सरकारकडे केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com