शहाजीबापू पाटलांना घेरण्याची उद्धव ठाकरेंची रणनीती : कट्टर विरोधकास पाठबळ!

आगामी निवडणुकीत आमदार पाटील यांना पराभूत करण्यासाठी शिवसेनेकडून व्यूहरचना आखली जात आहे.
Laxman Hake
Laxman HakeSarkarnama

सोलापूर : सांगोल्याचे (Sangola) आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Patil) यांना घेरण्याची तयारी शिवसेनेकडून (Shivsena उद्धव बाळासाहेब ठाकरे) आखण्यात आली आहे. आमदार पाटील यांचे कट्टर विरोधक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांना शिवसेनेकडून मोठे पाठबळ देण्यात येत आहे. हाके यांच्यावर पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आमदार पाटील यांना पराभूत करण्यासाठी शिवसेनेकडून व्यूहरचना आखली जात आहे. (Laxman Hake elected as Shiv Sena spokesperson)

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत शहाजी पाटील हे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले आहेत. मात्र, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात सहभागी होत पाटील यांनी ठाकरेंच्या विरोधात उघड भूमिका घेतली. त्यांनी ठाकरे यांच्या विरोधात अनेकदा कडवट शब्दांत टीका केली आहे. आदित्य ठाकरेंवर शहाजी पाटील यांनी शेलक्या शब्दांत निशाणा साधला होता. त्यावर आदित्य ठाकरेंनी ‘आम्ही गद्दारांना किंमत देत नाही’ असे सांगून पाटील यांना अनुल्लेखाने मारले हेाते. मात्र, त्याच वेळी सांगोल्यातच शहाजी पाटील यांना घेरण्याची रणनीती आखण्यात येत होती.

Laxman Hake
पाटील-परिचारकांविरोधात आता सर्वच निवडणुकांत महाडिकांचा उमेदवार असणार : महाडिकांचे आव्हान

आमदार महादेव जानकर आणि गोपीचंद पडळकर यांच्या तालमीत तयार झालेले लक्ष्मण हाके यांनी पाटील यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी त्यांना थेट उपनेते करण्यात आले होते. आता त्यांच्यावर आता पक्षाची भूमिका मांडण्याची प्रवक्तेपदाची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. आमदार पाटील हे शिंदे गटाची भूमिका मांडताना ठाकरेंवर निशाणा साधत आहेत. त्यामुळे शहाजी पाटलांना घेरण्याची तयारी शिवसेनेकडून करण्यात येत आहे.

Laxman Hake
राजन पाटलांचा भाजप प्रवेश लटकणार..?: धनंजय महाडिकांनी घेतली ही भूमिका

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेकडून ही तयारी करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या वेळी लक्ष्मण हाके हे सांगोल्याचे शिवसेनेचे उमेदवार होऊ शकतात, या दृष्टीने शिवसेनेची पाऊले पडत आहेत. ठाकरेंची ही रणनीती यशस्वी होते का हे पाहण्यासाठी विधानसभा निवडणुकीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com