Tata Airbus : शशिकांत शिंदे संतप्त; म्हणाले, आता बढाया मारणारे गप्प का...

टाटा एअरबस प्रकल्प Project गुजरातला Gujrat गेल्यानंतर महाविकास आघाडीच्या Mahavikas aghadi नेत्यांनी भाजपसह BJP शिंदे, फडणवीस Fadanvis सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
Eknath Shinde, Shashikant Shinde
Eknath Shinde, Shashikant Shindesarkarnama

सातारा : पंतप्रधान देशाचे आहेत की गुजरात राज्याचे पंतप्रधान आहेत, असा प्रश्न आता महाराष्ट्राला पडायला लागला आहे. राज्य सरकार अस्तित्वात आल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत एक प्रकल्प गेला तर दुसरा प्रकल्प आणला जाईल, अशा बढाया मारणारे आज गप्प बसलेत, असा संतप्त सवाल राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे.

नागपूरमधील प्रस्तावित टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपसह शिंदे, फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे हेही संतप्त झाले आहेत.

आमदार शिंदे म्हणाले, देशाच्या पंतप्रधानांनी केंद्र सरकारमधील आपल्या अधिकाराचा दुरूपयोग करून देशामध्ये इतर नव्हे तर फक्त आणि फक्त गुजरातमध्येच मोठे मोठे प्रकल्प नेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र मधील फॉक्सकॉन, ब्लक ड्रगनंतर सी-295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट असे सगळे प्रकल्प एक एक करून गुजरातला नेण्याचा घाट घातला जात आहे.

Eknath Shinde, Shashikant Shinde
Tata Airbus : गुजरात निवडणुका जिंकण्यासाठीच प्रकल्प पळवले : रोहित पवारांचा आरोप!

प्रकल्पाच्या संदर्भात होत असलेली मंजुरी महाराष्ट्रात चर्चा होत असताना प्रकल्प बाहेर राज्यात जातातच कसे, असा प्रश्न करून आमदार शिंदे म्हणाले, कोणाच्या कार्यकाळात गेले हे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आहे ते प्रकल्प वाचवावेत. पंतप्रधान देशाचे आहेत की गुजरात राज्याचे पंतप्रधान आहेत, असा प्रश्न आता महाराष्ट्राला पडायला लागला आहे.

Eknath Shinde, Shashikant Shinde
Satara : सत्ताधाऱ्यांकडून लोकांना संभ्रमित करण्याचा डाव... बाळासाहेब पाटील

राज्य सरकार अस्तित्वात आल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत एक प्रकल्प गेला तर दुसरा प्रकल्प आणला जाईल, अशा बढाया मारणारे आज गप्प बसले आहेत. आणि ज्या प्रकल्पाची चर्चा केली जाते त्याच प्रकल्पाचे कोनशिलेचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होते हा योगायोग समजावा का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. केंद्र सरकारच्या आशीर्वादाने बनलेल्या राज्य सरकारने जबाबदारी झटकण्यापेक्षा नवीन प्रकल्पाबरोबरच परराज्यात गेलेले प्रकल्प आणणार का, याचे उत्तर त्यांनी द्यावे.

Eknath Shinde, Shashikant Shinde
Tata Airbus : गुजरातला वेगळा देश निर्माण होणार आहे का... सतेज पाटलांचा सवाल

फक्त सरकार पाडण्यासाठी राज्याचा उपयोग करायचा आणि मुंबई व महाराष्ट्राचे महत्त्व कमी करायचे आजवरही केलेली ही कारस्थाने महाराष्ट्रातील जनतेने उघड्या डोळ्यांनी पहिली आहेत. फक्त सरकार बनवण्यासाठी दिल्लीचा आशीर्वाद घ्यायचा का, असा सवाल करून सत्ताधाऱ्यांचे जर एवढे वजन असेल तर गेलेले प्रकल्प पुन्हा आणा. नाहीतर महाराष्ट्र पोरका करण्याचे पाप तुमच्या माथी लागेल हे लक्षात ठेवा, असा इशाराही आमदार शिंदे यांनी दिला आहे.

Eknath Shinde, Shashikant Shinde
Sachin Kharat On TATA-Air Bus Project : टाटा-एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्याने RPI आक्रमक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com