कामे कशी करून घ्यावीत, हे काँग्रेसकडून शिका : चंद्रकांत पाटलांचा भाजप कार्यकर्त्यांना सल्ला

महाविकास आघाडीचे सरकार भाजपच्या कार्यकर्त्यांशी सूड भावनेने वागत होते.
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama

सांगोला (जि. सोलापूर) : हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, विकासकामांना गती देण्यासाठी व जनसामान्य बळ देण्यासाठी हे सरकार स्थापन झाले आहे. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांशी सूड भावनेने वागत होते. कार्यकर्त्यांनी कामे कशी करून घ्यावीत, हे काँग्रेसकडून (Congress) शिकावे, अशी मार्मिक टिप्पणी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली. (Learn how to get things done from Congress : Chandrakant Patil)

सांगोला येथे सोमवारी (ता. ३ ऑक्टोबर) भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना मंत्री पाटील बोलत होते.

Chandrakant Patil
आमदारकीच्या यादीतून नाव वगळलं तर मी राज्यपालांवर केस करेन : आनंद शिंदे भडकले

चंद्रकांत पाटील म्हणाले की, पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीनंतर राज्यात सत्तातंराला सुरुवात झाली. दररोज अजित पवार, जयंत पाटील घोषणा करीत फिरत आहेत. कोरोना काळात घरी बसणारे आज दररोज सभा, आक्रोश मेळावे घेत आहेत.

Chandrakant Patil
सांगोल्यात खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकरांच्या ‘लाव रे फोन’ची चर्चा!

दरम्यान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी बैठकीत लोकसभा मतदारसंघातील जनतेचे प्रश्न, अडीअडचणी जाणून घेत बैठकीतूनच अधिकाऱ्यांशी दूरध्वनीकरून संपर्क साधत गावांच्या समस्या तात्काळ सोडविण्याच्या सूचना दिल्या. तसेच, लवकरच सांगोला तालुक्याची आढावा बैठक घेवून प्रत्येक गावांचा गावभेट दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Chandrakant Patil
'पवारसाहेब, आमच्यापेक्षा तुम्ही फार पॉवरफुल्ल आहात...बागुलांसाठी काँग्रेसश्रेष्ठींकडे शब्द टाका!'

या वेळी खासदार रणजितसिंह निंबाळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे, धैर्यशील मोहिते-पाटील, शशिकांत चव्हाण, भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, माजी सभापती संभाजी आलदर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com