Satej Patil IN Legislative Council : कोल्हापुरकरांची चिंता वाढली..; सतेज पाटलांच्या मागणीवर फडणवीस उत्तर देणार..

Maharashtra Rains : पावसाळ्यापूर्वीच हे नियोजन करणं गरजेचं होतं, मात्र आता तरी सरकार गांभीर्याने याकडे लक्ष देणार का ?
Satej Patil
Satej Patilsarkarnama

Kolhapur : पावसाळा आला की कोल्हापुरकरांची अस्वथता वाढते. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. नागरिकांच्या काळजात धस्स होऊ लागलं आहे. त्यातच अलमट्टी धरणाच्या पाणी विसर्गाबाबत दोन्ही राज्याच्या मंत्र्यांमध्ये बैठकच झाली नसल्याचे आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केल्याने चिंता वाढली आहे.

दरवर्षी अलमट्टी प्रमाणापेक्षा जास्त पाणी अडवले की सांगली, कोल्हापूर ही शहरे पाण्याखाली जातात, हा अनुभव आहे. याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेत सतेज पाटील यांनी लक्ष्यवेधी मांडली.

Satej Patil
Nilam Gorhe Vs Gopichand Padalkar News : नीलम गोऱ्हे पडळकरांवर भडकल्या ; आज सभागृहात बोलण्यास बंदी

कर्नाटक आणि महाराष्ट्राचे अधिकारी एकमेकांच्या संपर्कात आहेत, मात्र दोन्ही राज्यातील मंत्र्यांची बैठक होणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या चर्चेत अलमट्टीतून 1 लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग करावा, अशी मागणी सतेज पाटलांनी केली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देतील असे सभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं आहे.

Satej Patil
Uddhav Thackeray ON Raj Thackeray : मनसेने युतीचा प्रस्ताव दिला तर काय कराल? उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच भूमिका मांडली ; म्हणाले..

पावसाळ्यापूर्वीच हे नियोजन करणं गरजेचं होतं, मात्र आता तरी सरकार गांभीर्याने याकडे लक्ष देणार का हा प्रश्न आहे. गेल्या पाच वर्षात कोल्हापूर, सांगली शहर आणि जिल्ह्यातील काही गावांना महापूरान मोठा फटका दिला आहे. नदीकाठच्या समृद्ध परिसराचे जनजीवन अस्ताव्यस्त केले आहे. या परिस्थितीला कमी वेळात जास्त होणारा पाऊस आणि कर्नाटकातील अल्लमट्टी धरण कारणीभूत आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com