Pune University Controversy : पुणे विद्यापीठ की पब? मुलींच्या वसतीगृहात दारूच्या बाटल्यांचा खच अन् सिगारेटची पाकिटं

Pune University Girls Hostel : पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतीगृहात धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून दारूच्या बाटल्यांचा खच अन् सिगारेटची पाकिटं सापडली आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली असून पुणे विद्यापीठ आहे की पब? असा सवाल उपस्थित केला जातोय.
Pune University students caught with alcohol
Pune University students caught with alcoholSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे हे विद्येचं माहेर घर असून येथे देशासह जगभरातील विद्यार्थी शिकण्यासाठी येतात. राज्यातील विविध ठिकाणांहून लाखो तरूण येथे चांगेल शिक्षण मिळते म्हणून पुण्याची वाट धरतात.

तर पुणे विद्यापीठात प्रवेश मिळावा म्हणून कसूनन तयारी करतात. मात्र आता याच सावित्रीबाई फुले विद्यापीठात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून मुलींच्या वसतीगृहात दारूच्या बाटल्यांचा खच आणि सिगारेटची पाकिटं सापडली आहेत. यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठमधील मुलींच्या वस्तीगृहात मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणात दारू आणि धूम्रपान केलं जात असल्याचं उघड झाले आहे. हा प्रकार वसतीगृहातील मुलींकडूनच सुरू असल्याचा आरोप एका विद्यार्थीनी केल्याने समोर आला आहे.

विद्यापीठातील मुलींच्या वस्तीगृहात मुलींकडूनच मद्यप्राशन आणि धूम्रपान सुरू होता. याबाबत वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीने वसतिगृह महिला अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती. एनेकदा तक्रार करूनही यावर कोणताच तोडगा निघत नव्हता. यामुळे संबंधित विद्यार्थिनीने प्रभारी कुलसचिव आणि कुलगुरू यांना पत्रातून सर्व घटनाक्रम सांगितला. मात्र प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप त्या मुलीने केला आहे.

Pune University students caught with alcohol
विद्यापीठातील मेसच्या जेवणात दगड, धोंडे; अमित ठाकरेंनी पुरावेच काढले|Amit Thackeray |Pune University

दरम्यान आता विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहामध्ये मोठ्या प्रमाणावर दारुच्या बाटल्या आणि सिगारेटची पाकिटं आढळून आलेली आहेत. मुलींच्या रुममधील काही फोटो आता समोर आली आहेत. यामुळे विद्यापीठात नेमकं काय सुरूय असा सवाल उपस्थित होत आहे.

तर संबंधित मुलीने जुलै महिन्यापासून तिच्या रुममेट्सने तिला अंमली पदार्थांचे सेवन करुन त्रास दिल्याचा आरोप केला आहे. तसेच या मुलींच्या दारु, सिगारेटमुळे मायग्रेनचा त्रास झाला असून मानसिक आणि शारिरीक छळ केला जातोय असाही दावा तीने केला आहे. याच या त्रासाला कंटाळून तिने वारंवार तक्रार केली होती. मात्र या तक्रारीवर कोणतीच कारवाई झाली नाही.

Pune University students caught with alcohol
Amit Thackeray Andolan at Pune University : मनसेच्या मोर्चात विद्यार्थी कमी अन् कार्यकर्तेच जास्त

या प्रकारानंतर आता एबीव्हीपीने आक्रमक भूमिका घेतली असून या सर्व प्रकारावर चौकशी समिती गठित करण्याची मागणी कुलगुरूंकडे केली आहे. तसेच कठोर कारवाईची देखील मागणी केली आहे. त्यामुळे आता नेमके या प्रकाराता कोणती कारवाई होते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com