Amit Thackeray Andolan at Pune University : मनसेच्या मोर्चात विद्यार्थी कमी अन् कार्यकर्तेच जास्त

MNS March On Pune University : लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेचे शक्तिप्रदर्शन अन् अमित ठाकरेंचं लोकसभेपूर्वी पुण्यात री लॉन्चिंग?
MNS
MNS Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी धडक मोर्चा काढण्यात आला. या धडक मोर्चाच्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. यासाठी फक्त शहरातूनच नव्हे तर जिल्हाभरातून पदाधिकारी दाखल झाले आहेत. Amit Thackeray Andolan at Pune University

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मराठी भाषा भवनाची निर्मिती पूर्ण करणे, विद्यापीठाची शांतता भंग करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करावी, तातडीने नवे वसतिगृह बांधण्याची प्रक्रिया सुरू करावी, यांसह अनेक मागण्यांकरिता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी चतुःशृंगी मंदिरापासून विद्यापीठापर्यंत मोर्चा काढण्यात आला.

MNS
Chitra Wagh : ओ मोठ्ठ्या ताई..! चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंना डिवचलं; म्हणाल्या, 'तुतारी...'

मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चाला मनसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती. या मोर्चाला शहरातील मनसेचे जवळपास सर्वच पदाधिकारी झाडून उपस्थित होते. या पदाधिकाऱ्यांसमवेत कार्यकर्त्यांच्या मोठ्या फौजा या मोर्चामध्ये दाखल झाल्या होत्या. कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी या मोर्चाला झाली असली तरी ज्या विद्यार्थ्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता, त्या विद्यार्थ्यांची संख्या मात्र या मोर्चामध्ये नगन्य प्रमाणात दिसून येत होती.

त्याउलट पुण्यातील या मोर्चाला पुण्याबाहेरील कार्यकर्तेदेखील मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. तसेच शर्मिला ठाकरे, बाळा नांदगावकर यांच्यासारखे वरिष्ठ नेतेदेखील या मोर्चामध्ये सहभागी झाल्याने लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांचं 'री लॉन्चिंग' तर केलं जातं नाही ना, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. Amit Thackeray Andolan at Pune University

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी अमित ठाकरे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सांगितलं तर... मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढेल, असं सूचक विधानदेखील अमित ठाकरे यांनी अनौपचारिक गप्पा मारताना केलं आहे. या सगळ्या गोष्टींमुळे अमित ठाकरे यांच्या लोकसभा एन्ट्रीला बळ मिळत असल्याचं बोललं जात आहे.

Edited By : Rashmi Mane

R

MNS
Loksabha Election 2024 : आता धंगेकर घरी बसणार; फडणवीसांची पाठराखण करताना मुळीकांकडून धंगेकरांचा समाचार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com