Solapur Bjp Politic's : विजयकुमार देशमुखांच्या मंत्रिपदासाठी लॉबिंग;समर्थक नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचे फडणवीसांना साकडे

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आत्तापर्यंत कॅबिनेट मंत्र्यांचाच शपथविधी झाला आहे.
VijayKumar Deshmukh
VijayKumar Deshmukhsarkarnama
Published on
Updated on

Solapur News : शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात सोलापूर जिल्ह्याला स्थान मिळालेले नाही. सध्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. त्यात सोलापूर शहरातील आमदार विजयकुमार देशमुख यांना संधी मिळावी, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठ नेत्यांना साकडे घालण्यासाठी शहर उत्तर मतदारसंघातील माजी नगरसेवक, समर्थक आणि कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले आहेत. (Lobbying for Vijayakumar Deshmukh's ministerial post)

महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात सोलापूर शहर आणि जिल्ह्याला मंत्रिपद नव्हते. शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारातही सोलापूरला स्थान मिळालेले नाही. फडणवीस सरकारच्या काळात (२०१४) जिल्ह्यातील दोन्ही देशमुखांना मंत्रीपदाची लॉटरी लागली होती. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आत्तापर्यंत कॅबिनेट मंत्र्यांचाच शपथविधी झाला आहे. राज्यमंत्री म्हणून कोणीही शपथ घेतली नव्हती, त्यामुळे मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळेल याची उत्सुकता आहे.

VijayKumar Deshmukh
Shinde Group MLA News : शिंदे गटाच्या आमदाराने खा खा खाल्ले अन्‌ ४० हजारांचे बिल पाहून कॅन्टिनचालकावरच भडकले

सध्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे. या विस्तारात आमदार विजयकुमार देशमुख (Vijaykumar Deshmukh) यांच्याकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी शहर उत्तर मतदारसंघातील देशमुख समर्थकांनी मंगळवारी मुंबई गाठली आहे. सोलापूर जिल्ह्याने निवडणुकीच्या माध्यमातून भाजपला (BJP) भरभरून दिले आहे. दोन खासदार आणि पुरस्कृतसहीत सात आमदार भाजपने निवडून दिलले आहेत. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्यातील एका आमदाराला स्थान मिळालेली नाही, त्यामुळे जिल्ह्यात काहींशी नाराजीची भावना आहे.

VijayKumar Deshmukh
Baramati News : अखेर ठरलं…कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या बारामती येणार; अहिल्यादेवी होळकर जयंती दणक्यात साजरी होणार

देशमुखांसारखे वरिष्ठ नेते असतानाही नगरच्या राधाकृष्ण विखे-पाटील यांना सोलापूरचे पालकमंत्री म्हणून नेमले आहे. दिग्गजांना डावलून उपऱ्या नेत्याची पालकमंत्री म्हणून झालेली निवड ही अनेकांना आवडलेली नाही. त्यामुळे भाजपमध्ये अंर्तगत नाराजीचा सूर आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच भाजप विधानसभा मतदारसंघांतील विकास योजना पूर्ण करण्यासाठी स्थानिक नेत्याकडे मंत्रिपदाची ताकद असणे महत्त्वाचे मानले जाते.

VijayKumar Deshmukh
Patole On Shivsena Advt : फडणवीसांचा एवढा अपमान शिंदे करतील, असं वाटलं नव्हतं; काँग्रेसनं उपमुख्यमंत्र्यांच्या जखमेवर मीठ चोळले

जिल्ह्याला वजनदार मंत्रीपद मिळाले नाही, तर त्याचा विपरित परिणाम विकासावर होऊ शकतो, अशी खदखद कार्यकर्त्यांमध्ये होती. शहर उत्तरच्या कार्यकर्त्यांनी आगामी विस्तारात आमदार विजयकुमार देशमुखांना यांना मंत्रीपद मिळावे, यासाठी माजी नगरसेवक संजय कोळी, रवी कैय्यावाले, रवी गायकवाड, अविनाश पाटील, राजकुमार पाटील, पप्पू महाले, काकडे, अजित बनसोडे आदी कार्यकर्ते पक्षश्रेष्ठींकडे साकडे घातले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com