Patole On Shivsena Advt : फडणवीसांचा एवढा अपमान शिंदे करतील, असं वाटलं नव्हतं; काँग्रेसनं उपमुख्यमंत्र्यांच्या जखमेवर मीठ चोळले

आमचे मित्र फडणवीस यांच्या खुर्चीला धोका निर्माण झाला आहे.
Nana Patole-Devendra Fadnavis-Eknath Shinde
Nana Patole-Devendra Fadnavis-Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : आमचे मित्र देवेंद्र फडणवीस यांचा एवढा अपमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील, असं वाटलं नव्हतं. कारण ‘दुश्मन ना करे, वह काम दोस्तने किया है,’ अशी हालत आमचे मित्र फडणवीस यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून ठेवली आहे, हे दुर्भाग्य आहे, अशी बोचरी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. (I did not think that Eknath Shinde would insult Devendra Fadnavis so much : Nana Patole)

देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात शिंदे अशी एक जाहिरात शिवसेनेकडून आज राज्यातील सर्वच वर्तमान पत्राला देण्यात आलेली आहे. त्यात एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांना मुख्यमंत्री म्हणून २६. १ टक्के मतदारांनी पसंती दिली आहे, तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना २३.२ टक्के मतदारांनी पाठींबा दर्शविला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आपणच सर्वाधिक लोकप्रिय असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न शिंदेंकडून झाला आहे. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले बोलत होते.

Nana Patole-Devendra Fadnavis-Eknath Shinde
Gajanan Kirtikar News : 40 आमदारांमुळे भाजप सत्तेत; किर्तीकरांनी वाढवला शिंदे गटाच्या नेत्यांचा आत्मविश्वास!

पटोले म्हणाले की, भाजपकडून नेहमी देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशी घोषणाबाजी व्हायची. पण आज परिस्थिती बदललेली आहे. आमच्या मित्राने (फडणवीस) जपून कसं राहावं, हे शिकलं तर स्पष्ट होईल की ही जाहिरातबाजी खरी आहे की खोटी आहे, हा नंतरचा प्रश्न आहे. पण, माझे मित्र देवेंद्र फडणवीस यांना धोका निर्माण झाला आहे, एवढं मात्र सांगता येईल.

Nana Patole-Devendra Fadnavis-Eknath Shinde
Dispute in BJP-Shivsena : शंभर आमदारांचा भाजप ‘राष्ट्रात नरेंद्र, महाराष्ट्रात शिंदे’ स्वीकारणार का?; फडणवीसांचे काय होणार

शंभूराज देसाई यांनी जनमताचा कौल स्वीकारला पाहिजे, त्याचा आदर केला पाहिजे, असे म्हटले आहे. त्यावर बोलताना पटोले म्हणाले की, त्यामुळेच आम्ही म्हणत आहोत की, आमचे मित्र फडणवीस यांच्या खुर्चीला धोका निर्माण झाला आहे. आमचे मित्र म्हणतात की मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. मात्र, राज्यात पुन्हा दाढीवाले यायला निघाले आहेत. एक दिल्लीत दाढीवाले आणि दुसरे राज्यात दाढीवाले. त्यावर मला जायचे नाही. पण, अखेर निवडणुकीत जनमत आल्यानंतर कळेलच की मतदान होईल आणि जनमत येईल, तेव्हा बघूयात की कोण मुख्यमंत्री होणार आहे.

Nana Patole-Devendra Fadnavis-Eknath Shinde
Rohit Pawar on Shiv Sena's Advt : फडणवीसांपेक्षा शिंदे जादा लोकप्रिय; रोहित पवार म्हणतात, ‘शिंदे गट स्वतःला....’

भाजप पुन्हा एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदारांच्या जोरावर सत्तेत आले आहे, त्यामुळे चाळीस आमदारांनी एकत्र राहिले पाहिजे, असे खासदार गजनान किर्तीकर यांनी म्हटले आहे, त्यावर पटोले म्हणाले की, म्हणूनच म्हणतोय, होऊद्या त्यांच्यात खटके. भाजप शिंदे गटाला काय धडा शिकवणार आहे, हे येणाऱ्या काळात सांगेन. ही सुरुवात आहे. त्यांच्या पक्षातील अंतर्गत बाबीवर प्रतिक्रिया देण्याचे कारण नाही. पण शिंदे गटाला फार मोठा धडा भाजप येत्या काळात शिकवेल, असे भाकीतही पटोले यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com