Local Body Election : नव्या वर्षात उडणार गावगाड्यांचा बार, प्रशासनाकडून निवडणूक घेण्याच्या हालचाली सुरू

Gram Panchayats Elections : राज्य निवडणूक आयोगाने 15 जानेवारी 2025 च्या प्रभाग रचनेला अंतिम मान्यता दिली आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडून अंतिम प्रभाग रचना जाहीर होण्याची शक्यता आहे.
Grampanchayat
Grampanchayat Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: राज्यातील विधानसभा निवडणुकीचा धुरळा जमिनीवर बसला असताना आता कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीचा धुरळा नव्या वर्षात उडणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 433 ग्रामपंचायतच्या निवडणुका पुढील वर्षात होणार आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने 15 जानेवारी 2025 च्या प्रभाग रचनेला अंतिम मान्यता दिली आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडून अंतिम प्रभाग रचना जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या नव्या वर्षाच्या तीन ते चार महिन्यापर्यंत जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 433 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सामना गावगाड्यात रंगणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीची मुदत ही 2019 ला संपली आहे. परंतु कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तर काही ग्रामपंचायतीतलं कामकाज ठप्प असल्याने यातील काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका 2020 मध्ये घेण्यात आल्या होत्या.

Grampanchayat
Maharashtra Assembly Winter Session LIVE : काँग्रेस कार्यालयावरील हल्लाप्रकरणी 12 कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

जानेवारी 2025 पर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीची संख्या 433 इतकी आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुक काही टप्प्यात घेण्यात येणार असल्याचे नियोजन प्रशासनाकडून सुरू आहे.

पुढील वर्षी दिवाळीपर्यंत या सर्व निवडणूक घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. दोन डिसेंबर 2024 पर्यंत सर्व तहसीलदारांना गुगल अर्थच्या माध्यमातून सर्व गावाच्या नकाशाचे अंतिम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार तलाठी, ग्रामसेवक यांनी 24 जानेवारी 2025 पर्यंत अंतिम प्रभाग रचना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Grampanchayat
Nagpur Winter Session: RSSमधूनच माझ्या राजकीय जीवनाची सुरवात; रेशीमबागेत शिंदेंचे डॉ. हेडगेवारांना अभिवादन!

राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका उत्साहात पार पडल्या. राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आता स्थानिक पातळीवरील निवडणुकांचे वेध लागले आहेत. लोकसभा, विधानसभे इतकेच गाव पातळीवरील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला विशेष महत्त्व असते.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत लाखो, कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. उमेदवारांचा प्रत्यक्ष कागदावरचा खर्च नगण्य असतो, परंतु प्रत्यक्षातील पडद्यामागचा खर्च कोट्यावधी रुपयांचाही होतो असे वास्तव आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्यातील ग्रामपंचायती

गगनबावडा- ८

करवीर - ५२

हातकणंगले - २२

कागल - ५४

शाहूवाडी - ४३

पन्हाळा - ४८

शिरोळ - ३३

चंदगड - ४१

राधानगरी - २१

भुदरगड - ४६

आजरा - २६

गडहिंग्लज- ५३

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com