Satara Politics : सातारचा गड आपल्याकडे ठेवण्यासाठी आघाडी, महायुतीतील मित्रपक्षांच्या हालचाली सुरू

Maharashtra Political Strategy : राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. विधानसभा, लोकसभेची निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे लढवली असली तरी स्थानिकच्या निवडणुकांसाठी प्रत्येक पक्षाने स्वबळावर लढण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे.
Mahavikas Aghadi-Mahayuti
Mahavikas Aghadi-MahayutiSarkarnama
Published on
Updated on

Satara News, 01 Feb : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याचा निर्णय 25 फेब्रुवारीनंतर होणार आहे. मात्र, सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. विधानसभा, लोकसभेची निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणून एकत्रितपणे लढवली असली तरी स्थानिकच्या निवडणुकांसाठी प्रत्येक पक्षाने स्वबळावर लढण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे.

यासाठी आपापल्या कार्यक्षेत्रात सभासद नोंदणीच्या माध्यमातून पक्षाची ताकद वाढविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. सातारा जिल्ह्या हा संस्थांवर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र राष्ट्रवादीची ताकद कमी करून आपलं वर्चस्व वाढण्यासाठी भाजप (BJP) जोरदार प्रयत्न करणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीसाठी जोर बैठकांचा जोर वाढला आहे.

तर दुसरीकडे आता जिल्ह्यातील सर्वच पक्षांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आपल्या ताब्यात घेण्यासाठी रणनीती आखायला सुरूवात केली आहे. तर या जिल्ह्यात कोणत्या पक्षाचं नेतृत्व मजबूत आहे आणि कोणाला जास्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत ते जाणून घेऊया.

भाजपची साताऱ्यात मोठी ताकद निर्माण झाली आहे. जिल्ह्यात भाजपचा एक खासदार आणि चार आमदार तर त्यापैकी दोन मंत्री आहेत. या सर्वांनी जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. यासाठीच भाजपने सभासद नोंदणी सुरू केली आहे. या माध्यमातून भाजपचा प्रत्येक घरात पोहोचण्याचा प्रयत्न आहे. आतापर्यंत भाजपची 3 लाखांवर सभासद नोंदणी झाली आहे. त्यामुळे भाजप महायुती (Mahayuti) वा स्वबळावर निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी आतापासून तयारीत असल्याचं पहायला मिळत आहे.

राष्ट्रवादी

भाजपनंतर साताऱ्यात (Satara) अजितदादांच्या राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. तीन आमदार आणि एक खासदार एक मंत्री आहे.राष्ट्रवादीने नुकतंच पदाधिकारी निवडी करत आपले अस्तित्व दाखवलं आहे. तर पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फळी मजबूत करण्यासाठी लवकरच तालुकानिहाय पदाधिकारी निवडी आणि सभासद नोंदणी करण्यात येणार आहे. तर शरद पवार गटातील अनेक पदाधिकारी अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात अजितदादांच्या राष्ट्रवादीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढू शकते.

Mahavikas Aghadi-Mahayuti
Nirmala Sitharaman Speech LIVE : किसान क्रेडिट कार्डवरील कर्जाची मर्यादा वाढवली, अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी महत्वाची घोषणा

शिंदेंची शिवसेना

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे दोन आमदार आणि एक मंत्री व कृष्णा खोरे उपाध्यक्षपद असतानाही जिल्ह्यात पक्षाची म्हणावी अशी ताकद नाही. विधानसभेच्या काळात पक्ष सोडून गेलेल्यांच्या जागी अद्याप या पक्षाकडून नव्या नियुक्त्या करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे सध्या पक्षाचं काम करण्यासाठी पदाधिकाऱ्यांची कमतरता भासत आहे.

पाटण आणि कोरेगावात तालुक्यात शिवसेनेची (Shivsena) ताकद चांगली असली तरी जिल्ह्यात म्हणावं असं पक्षाचं जाळ पसरलेलं नाही. त्यामुळे सेनेला आता नव्याने तयारी करावी लागणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि खुद्द पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील असूनही पक्ष संघटना म्हणावी अशी मजबूत नाहीये.

शरद पवार गट

विधानसभेतील पराभवानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अद्याप म्हणावा तेवढा वेग घेतलेला नाही. मागील वीस वर्षांत पक्षाने जिल्ह्यावर ठेवलेले वर्चस्व पक्षफुटीनंतर विभागले आहे. अशातच जिल्ह्यात सक्षम विरोधक म्हणून स्थानिकच्या निवडणुकीत आपले स्थान मजबूत ठेवण्यासाठी चांगला संघर्ष करवा लागणार आहे. सध्यातरी आमदार शशिकांत शिंदेंवरच या पक्षाची कमान असणार आहे. तर त्यांच्या जोडीला माजी आमदार बाळासाहेब पाटील यांनाही आपला गड राखण्यासाठी चांगलंच झगडावं लागणार आहे.

Mahavikas Aghadi-Mahayuti
New Tax Regime 2025 : मध्यमवर्गासाठी मोदींची मोठी भेट; 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न केले करमुक्त

काँग्रेस

राष्ट्रवादीच्या खालोखाल साताऱ्यात काँग्रेसची ताकद होती. पण यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे एकमेव आमदार पृथ्वीराज चव्हाणांना देखील पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे पक्ष संघटना विस्कळित झाली आहे. विरोधक म्हणून आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेसचे अस्तित्व टिकून आहे. मात्र, पक्षाची एकजूट करून आगामी स्थानिकच्या निवडणुकीत पक्षाला पुन्हा पूर्ण ताकदीने उभं करणं गरजेचं असून याची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर आहे. तर त्यांना आता स्थानिक स्वराज्य संस्थांतील आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी चांगलेत कष्ट घ्यावे लागणार आहेत.

ठाकरेंची शिवसेना

ठाकरेच्या शिवसेनेची जिल्ह्यात चांगली ताकद होती. पण राष्ट्रवादीप्रमाणे पक्षफुटीनंतर पक्ष चांगलाच बॅकफुटवर आला आहे. शिवाय सध्या जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी या पक्षाला चांगला चेहरा द्यावा लागणार आहे. तर आगामी निवडणुकीत पक्षाचे जास्तीतजास्त सदस्य जिल्हा परिषदेत व पंचायत समितीत निवडून आणण्यासाठी उपनेते नितीन बानुगडे पाटील यांना खूप प्रयत्न करावे लागणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com