Lok Sabha Election 2024 : कोल्हापुरात दोन राजघराण्यांमध्ये लढत? शाहू महाराजांविरोधात घाटगे मैदानात उतरण्याची शक्यता

Shahu Maharaj Chhatrapati Vs Samarjit Singh Ghatge : शाहू महाराज छत्रपती यांच्या विरोधात शाहू जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे यांना मैदानात उतरवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
shahu maharaj samarjitsignh ghatge
shahu maharaj samarjitsignh ghatgesarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : 9 मार्च | महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात ( Kolhapur Lok Sabha Constituency ) श्रीमंत शाहू महाराज छत्रपती ( Shahu Maharaj Chhatrapati ) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अशातच महायुतीने विद्यमान शिंदे गटाच्या खासदारांचा पत्ता कट करून नवा डाव टाकण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपकडूनदेखील राजघराण्यातीलच चेहरा समोर आणून कोल्हापूर लोकसभा निवडणुकीची हाय व्होल्टेज लढत करण्याचे संकेत दिले आहेत. विद्यमान खासदार संजय मंडलिक ( Sanjay Mandalik ) यांच्या ठिकाणी राजर्षी शाहू महाराज यांच्या जनक घराण्यातीलच आणि भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे ( Samarjitsingh Ghatge यांना उमेदवारी देण्याचा प्रस्ताव पुढे आणला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोल्हापूर लोकसभेसाठी महायुतीचा नवा डाव टाकला आहे. शाहू महाराज छत्रपती यांच्या विरोधात शाहू जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे यांना मैदानात उतरवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. समरजितसिंह घाटगे यांच्याकडून सगळ्या प्रकारावर मात्र मौन बाळगण्यात आलं आहे. पक्षशिस्त असल्याने सध्या कोणतीच प्रतिक्रिया द्यायला घाटगेंनी नकार दिला आहे. गेल्या दीड महिन्यापासून याची दबक्या आवाजात चर्चा होती. पण, यावर कोठेही खुली चर्चा करण्यात आली नव्हती. जिंकून येणाऱ्या उमेदवारालाच उमेदवारी देण्यावर भाजप ठाम असल्याने समरजितसिंह घाटगे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची शक्यता आहे.

सध्या या जागेवर संजय मंडलिक खासदार आहेत. शिंदे गटानेदेखील या जागेवर दावा कायम ठेवला आहे. शाहू महाराज यांच्या विरोधात आपण तगडा उमेदवार देणार असल्याचे शुक्रवारी ( 8 मार्च ) खासदार संजय मंडलिक यांनी स्पष्ट केले होते. मात्र, दिल्लीत झालेल्या बैठकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी समरजितसिंह घाटगे यांच्या उमेदवारीचा प्रस्ताव भाजपने मुख्यमंत्री शिंदे यांच्यापुढे ठेवल्याचे समजते. समरजितसिंह घाटगे यांनी उमेदवारी दिल्यास दोन्ही राजघराण्यात काटे की टक्कर होणार हे निश्चित आहे. शिवाय ऐनवेळी समरजित घाटगे यांचं नाव चर्चेत आल्याने कोल्हापूर लोकसभेबाबत उत्सुकता वाढली आहे.

मंडलिकांना नवी ऑफर

दरम्यान, भाजपच्या या प्रस्तावावर खासदार संजय मंडलिक यांच्यासमोर नवीन प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. खासदार मंडलिक यांना विधान परिषदेचे सदस्य करून त्यांना राज्यमंत्री पदाचे आश्वासन दिल्याची माहिती आहे.

पालकमंत्री मुश्रीफांच्या भूमिकेकडे लक्ष

पालकमंत्री हसन मुश्रीफ हेदेखील आता महायुतीचे घटक बनले आहेत. कागल विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटके यांचे राजकीय वैर सर्वश्रृत आहे. "महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी जिवाचे रान करणार," अशी प्रतिक्रिया वेळाेवेळी मुश्रीफ यांनी दिली आहे. जर समरजितसिंह घाटगे उमेदवार असतील तर पालकमंत्री मुश्रीफदेखील त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करतील, यात तीळ मात्र शंका नाही. पण, घाटगे यांच्या उमेदवारीवर हसन मुश्रीफ नेमकी प्रतिक्रिया काय देणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com