Prithviraj Chavan News : उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा का दिला नाही? पृथ्वीराज चव्हाणांचा खडा सवाल

Lok Sabha Election 2024 : नरेंद्र मोदींच्या विरोधात एक सुप्त लाट आहे. महाराष्ट्रात आश्चर्याचा धक्का बसेल असे निकाल लागतील, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
Prithviraj Chavan, UdayanRaje Bhosale
Prithviraj Chavan, UdayanRaje BhosaleSarkarnama

Karad News : सातारा लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्या. महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे आणि महायुतीचे उदयनराजे भोसले यांच्यामध्ये रंगतदार लढत होणार आहे. दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना आज प्रचाराच्या अखेरच्या दिवशी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan News) यांनी उदयनराजेंवर निशाणा साधला आहे.

राज्यसभा देतो, मंत्रिपद देतो, कारखान्यासाठी कर्ज देतो, अशी आश्वासने निवडणुकीत दिली गेली. मात्र त्याचा उपयोग होणार नाही, असे सांगुन सातारा (Satara Constituency) लोकसभा मतदारसंघाबाबत आमदार चव्हाण म्हणाले, खासदार उदयनराजे भोसलेंनी (Udayanraje Bhosale) मागील लोकसभेची (Lok Sabha Election 2024) उमेदवारी करण्यापूर्वी राजीनामा दिला होता. सध्या उमेदवार असताना त्यांनी राज्यसभेचा राजीनामा दिलेला नाही. जर निवडून यायची खात्री असती तर राज्यसभेचा राजीनामा दिला असता.

Prithviraj Chavan, UdayanRaje Bhosale
Abhijeet Patil : अभिजित पाटलांचा फडणवीसांना जाहीर सभेत शब्द; ‘आत एक अन्‌ बाहेर एक...’

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आमदार चव्हाण यांनी आज रविवारी माध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात एक सुप्त लाट आहे. महाराष्ट्रात आश्चर्याचा धक्का बसेल असे निकाल लागतील. निवडणुकीनंतर आत्ता अस्तित्वात असलेल्या सहापैकी दोन पक्ष संपतील, असे भाकीत चव्हाणांनी वर्तवले. (Latest Political News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोदी (Pm Narendra Modi) गोंधळलेले आहेत. लोकसभा निवडणुकीतील प्रचाराची पातळी मोदींनी खाली नेली. कधी शरद पवार गुरु आहेत म्हणत त्यांच्यावर टीका करायची. कधी उध्दव ठाकरेंवर वाईट बोलायचे. मोदींना त्यांचा अनपेक्षित पराभव दिसला आहे. भाजपच्या जास्त जागा येतील, असे देशात एकही राज्य नाही. त्यामुळे देशात त्यांना 272 जागाही मिळणार नसल्याने मोदींना मित्र पक्षांबरोबरही सरकार स्थापन करता येणार नाही, अशी टीका चव्हाण यांनी केली आहे.

विधानसभेपूर्वी अजून बऱ्याच घटना घडतील, असे सांगुन आमदार चव्हाण म्हणाले, मोदींना त्यांचे सरकार आणता येत नाही हे कळले आहे. कोणत्याही पंतप्रधानांनी घेतल्या नाहीत एवढ्या सभा मोदींनी घेतल्या. यावेळच्या निवडणुकीच्या प्रचारात भाजपकडून मोदी की गॅरंटी हा शब्द वापरला. हा व्यक्तीस्तोम माजवण्याचा प्रकार हुकुमशाहीकडे वाटचाल करणारा आहे. मोदींची हिटलरच्या विचारावर वाटचाल सुरु आहे. मात्र ते यशस्वी होणार नाहीत.

महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, भ्रष्टाचार आणि संविधान बचाव या मुद्यावर आम्ही ही निवडणुक लढली. सध्या अर्थव्यवस्था स्लो डाऊन असुन 55 लाख कोटींचे कर्ज 200 लाख कोटींवर नेले आहे. करातून लाखो कोटी रुपये मोदींनी वसुल केले आहेत. त्यामुळे लोकांत मोठा आक्रोश आहे. या निवडणुकीत लोकंच मोदींना घरी पाठवतील, असे चव्हाण म्हणाले.

Prithviraj Chavan, UdayanRaje Bhosale
Supriya Sule News : 'तुम्ही ज्यांना घाबरता आम्ही त्यांच्या समोर भाषण करतो', सुप्रिया सुळेंना अजितदादांना टोला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com