सांगलीत लोकसभेत ( Sangli Lok Sabha Election 2024 ) महाविकास आघाडीतील ( mahavikas Aghadi ) दोन पाटलांमध्ये उमेदवारीवरून वाद रंगला होता. शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी काँग्रेसच्या पारंपारिक मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली. त्यानंतर विशाल पाटील यांनी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. पण, या वादातील कळीचे नारद जयंत पाटील असल्याचा आरोप माजी आमदार विलासराव जगताप यांनी केला आहे. ते एका सभेत बोलत होते.
विलासराव जगताप ( Vilasrao Jagtap ) म्हणाले, "सगळ्या महाराष्ट्रातील नेत्यांची तिकीट स्वर्गीय वसंतदादा पाटील ( Vasantdada Patil ) यांच्या हातात होती. त्यांचे नातू विशाल पाटील ( Vishal Patil ) यांना तिकीटासाठी मुंबई, दिल्ली, नागपूरला हेलपाटे मारावे लागले. ही दु:खद घटना आहे. काँग्रेस पक्षात चाललंय काय? कोणाचं ऐकून तुम्ही काम करत आहात? यामागील कळीचे नारद जयंत पाटील आहेत. विशाल पाटील यांना तिकीट न मिळण्यामागे सगळी खेळी जयंत पाटलांनी केली. या वादामागे खलनायक जयंत पाटील आहेत."
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"संजय राऊतांच्या आडून जयंत पाटलांनी खेळी केल्या"
"सांगलीत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजप, असं तीन प्रमुख पक्ष आहेत. राष्ट्रवादीनं लोकसभेचं तिकीट मागितलं नाही. काँग्रेसवाले तिकीट मागत होते, तर डच्चू देण्यात आला. या सगळ्या खेळी संजय राऊतांच्या आडून जयंत पाटलांनी ( Jayant Patil ) केल्या आहेत. 'शिवसेनेचा एकही ग्रामपंचायत सदस्य किंवा एकही शाखा नाही. त्यामुळे चंद्रहार पाटलांना तिकीट देऊ नका. संजयकाकांना पाडायचं असेल, तर विशाल पाटील हा एकमेव पर्याय आहे,' असं संजय राऊतांना सांगितलं होतं. मात्र, राजकीय कुरघोडी करण्यात आली," अशी संतप्त प्रतिक्रिया जगताप यांनी व्यक्त केली.
"वसंतदादांचं घराणे जिवंत ठेवायचं आहे"
"वसंतदादांचं घराणे संपवण्याचा घाट जिल्ह्याच्या आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वानं घातला आहे. आपल्याला पर्यायी नेतृत्व म्हणून वसंतदादांचं घराणे जिवंत ठेवायचं आहे. दादाघराणे संपवणे ही गोष्ट निंदाजनक आहे. कुठल्याही नेत्याला हे शोभत नाही. पूर्वी राजारामबापू पाटील आणि वसंतदादा पाटील यांनी एकमेकांचे गट संपवण्याचा प्रयत्न केला नाही," असंही जगताप यांनी म्हटलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.