Jayant Patil News : 'आमचा पक्ष देशात सगळ्यात स्वच्छ', जयंत पाटलांनी मानले नरेंद्र मोदींचे आभार

Loksabha Election : पोरं शाळेतून गेली म्हणून शाळा बंद पडत नाहीत. नवीन पोरं येतात. शाळा त्यांना घडवते. आमचा हेडमास्तर खमक्या आहे, असे म्हणत जयंत पाटलांनी अजित पवार गटाला टोला लगावला.
Narendra Modi Jayant Patil
Narendra Modi Jayant Patilsarkarnama

Loksabha Election : माढा लोकसभा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहित पाटील यांच्यासाठी शरद पवारांनी सभांचा धडाका लावला आहे. मागील दोन दिवसांपासून शरद पवार माढा मतदारसंघात सभा घेत आहेत. आज (शनिवारी) शरद पवारांची सभा सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथे झाली. या सभेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले.

Narendra Modi Jayant Patil
Sunetra Pawar News : केंद्र आणि राज्य सरकारमधील दुवा बनून समस्या सोडविणार; सुनेत्रा पवारांची ग्वाही !

'मी मोदीसाहेबांचे आभार मानतो. त्यांनी भोपाळला एक घोषणा केली माझा सगळा पक्ष स्वच्छ झाला. भारतातील सगळ्यात स्वच्छ पक्ष कुठला असेल तर तो राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष आहे, हे मी ठामपणे सांगतो,' असे जयंत पाटील Jayant Patil म्हणाले. आमचा पक्ष फुटला. काही लोक फुटून बाजूला गेले. त्यांनी विचारधारा बदलली. पोरं शाळेतून गेली म्हणून शाळा बंद पडत नाही. नवीन पोरं येतात. शाळा त्यांना घडवते. आमचा हेडमास्तर खमक्या आहे, असे म्हणत जयंत पाटलांनी अजित पवार Ajit Pawar गटाला टोला लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'भाजप चारसौ पारची घोषणा देत आहे. त्यांची दोनशे पारची पंचायत आहे. चारसौ पार केलं तर संविधान बदलणार असे त्यांचे उमेदवार असणाऱ्या देशातल्या 11 जणांनी, खासदार असणाऱ्यांनी सांगितलं. पंकजा मुंडे यांनीदेखील सांगितलं मला दिल्लीला जायचं आहे. मला संविधान बदलायचं आहे. यांना संविधान बदलण्यासाठी चारसौ पार करायचं आहे', असा हल्ला जयंत पाटील यांनी भाजपवर केला.

'छगन भुजबळांची काय परिस्थिती आहे. दिल्लीने त्यांना उभे राहायला सांगितले. ते उमेदवारी अर्ज भरणार असे सांगितले जात होते. मात्र, ते उभे राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. महायुतीला उमेदवार मिळत नाही. भाजपच्या पुढाकाराने झालेल्या महायुतीत एक मत नाही. उसने उमेदवार घेऊन त्यांना निवडणूक लढवावी लागत आहे', असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

R

Narendra Modi Jayant Patil
Solapur Politics : जयवंतराव नेमके कुणाचे? शरद पवारांचे स्वागत अन्‌ विजयदादांशी चर्चा!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com